आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकल्प स्फूर्ती अभियानचे उद्घाटन:ग्रेट दयासागर फाउंडेशनतर्फे पथनाट्यातून सामाजिक संदेश

साेलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेट दयासागर फाउंडेशन संकल्प स्फूर्ती अभियानचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा हॉटेल सेंटर पाॅइंट येथे थाटात पार पडला. यावेळी विविध स्फूर्तिदायक गीते सादर करण्यात आली. तसेच पथनाट्यद्वारे सामाजिक संदेश देण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दीपक बनसोडे यांनी केले. अध्यक्षस्थानी श्याम चव्हाण होते. यावेळी आशिष चड्डा, नरसिंग सूर्यवंशी, दीपक बनसाेडे, श्याम चव्हाण, संदीप ब्रीदवडे, फादर मधुकर बनसाेडे, श्याम गायकवाड, अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती. कार्यक्रमाचा अजेंडा संस्थापक अध्यक्ष व कार्यकारी सचिव नरसिंग सूर्यवंशी यांनी मांडला.

येत्या काळात शहर व जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आराेग्य, पर्यावरण, सांस्कृतिक या विषयांवर कार्य करणार असल्याचे शेष कलापथक प्रतिकृती पथनाट्यातून सादर करण्यात आले. जिल्ह्याचा आढावा मीनाक्षी गायकवाड, आराेग्यावर प्राची काॅलियर, बेराेजगारीवर सचिन कांबळे, सामाजिक विषयावर विद्या जाधव, पुनर्वसन शहरातील बेवारस बेसहारा या विषयावर गौतम गवळी यांनी आपली मते मांडली. यावेळी घोषवाक्य सादर करण्यात आले. सूत्रसंचालन सरोजना ढोणे यांनी केले. आभार फादर मधुकर बनसाेडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...