आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:क्रूझरच्या धडकेत 6 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, सोलापुरातील अक्कलकोट येथील घटना

अक्कलकोटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे एका 6 वर्षीय चिमुरडीला भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी क्रूझर गाडीने पाठीमागून धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. वागदरी येथील श्रेया विठ्ठल चलगेरी असे या चिमुकलीचे नाव आहे. ही घटना वागदरी अक्कलकोट रोडवरील नागनाथ मंदिरासमोर आज सव्वा एकच्या सुमारास घडली.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धानलिंग मल्लिनाथ पोमाजी व श्रेया विठ्ठल चलगेरी हे मामा-भाची आपल्या शेतवस्तीवर रस्त्याच्या बाजूने पायी चालत जात होते. तेवढ्यात ​​​​​​​आळंदहून अक्कलकोटकडे जाणाऱ्या चारचाकी क्रूझर क्र के ए 09 बी 0022 या वाहनाने पायी चालत जाणाऱ्या 6 वर्षीय श्रेयास पाठीमागून जोरात धडक दिली आणि ती जमिनीवर कोसळली. गंभीर जखमी श्रेयास रुग्णवाहिकेतून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तपासले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले.

वाहन चालक प्रवीण रेवणसिद्धप्पा डोले रा. देगाव ता. आळंद यांच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून चालक व वाहन ताब्यात आहेत. या घटनेची फिर्याद प्रकाश पोमाजी यांनी दिली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...