आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:सोलापूर अक्कलकोट रोडवरील कुंभारी जवळ जीपचे टायर फुटून भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जीपमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांना होते

अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक प्रवासी हे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे.

मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात जवळपास 10 ते 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ उपचारांसाठी सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सोलापूर ग्रामिण पोलिसांकडून केले जात आहेत.

अक्कलकोट येथून एमएच 13 एएक्स 1237 या क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी क्रूझर जीप सोलापूरकडे येत होती. या जीपमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांना होते. परंतु सोलापूरच्या अलीकडे कुंभारी येथे भरधाव वेगातील जीपचे पुढील चाकाचे टायर फुटले आणि जीप पलटी झाली. या अपघातात जीपमधील अनेक प्रवासी बाहेर फेकले गेले. यामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...