आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदल्यांचा मोसम सुरू झाला असून तहसीलदार रूजू झाले पण प्रांताधिकारी पदासाठी अधिकाऱ्यांची प्रतीक्षा आहे. उत्तर सोलापूर व बार्शी प्रांताधिकारी हेमंत निकम, माढा प्रांताधिकारी स्वाती कदम तर मंगळवेढा प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर रजेवर गेले आहेत. त्यांच्या ठिकाणी इतर अधिकाऱ्यांकडे पदभार सोपविला आहे.
भूसंपादन कार्यालयाचीही अशीच अवस्था आहे. फक्त पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर, अक्कलकोटसाठी स्वतंत्र अधिकारी आहे. यामुळे महसूलमध्ये सर्व भार प्रभारीवरच सोपविण्यात आला आहे.
पदभार अप्परकडे
उत्तर सोलापूर व बार्शी प्रांताधिकारी हेमंत निकम यांची बदली झाली. सुरुवातीचे काही दिवस उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला. त्यानंतर त्यांच्याकडून मंगळवेढा प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांच्याकडे पदभार देण्यात आला. पण ते सुद्धा रजेवर गेल्यानंतर आता महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली.
माढा प्रांताधिकारी स्वाती कदम यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर अकलूज प्रांताधिकारी टिळेकर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. मंगळवेढा प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर रजेवर गेल्याने त्यांचा पदभार पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे दिला आहे.
भूसंपादनाबाबतही अवस्था अशीच
भूसंपादनबाबतही अशीच अवस्था आहे. भूसंपादन क्रमांक ७ चे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे अाधीपासूनच पंढरपूर पालखी मार्ग भूसंपादनाची जबाबदारी दिली आहे. भूसंपादन क्रमांक ११ च्या उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांची बदली झाल्यानंतर त्याचाही पदभार त्या कार्यालयाची जबाबदारी नागेश पाटील यांच्याकडेच सोपविण्यात आली.
दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार यांची पुनर्वसन तहसीलदारपदी बदली झाली, पण त्यांच्या ठिकाणी अद्याप तहसीलदारांची नियुक्ती केली नाही. इतर सर्व ठिकाणी तहसीलदार रूजू झाले आहेत.
कारभार प्रभारींवर
जिल्हाधिकारीही प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा तीन वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. त्यांच्याही बदलीच्या चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होत आहेत. ते एक महिना प्रशिक्षणासाठी मसुरी येथे जाणार असल्याचे कळते.
यामुळे आता जिल्हाधिकारी पदाचा पदभारही अपर जिल्हाधिकारी तुषार ठाेंबरे यांच्याकडे सोपविणार असल्याचे कळते. यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश येईपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचा कारभार प्रभारीवरच चालणार असल्याचे दिसते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.