आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलीकडे महापुरुषांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केले जात आहेत. त्याचा निषेध म्हणून बुधवारी दुपारी भीमसैनिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा द्वारे भीम आणि शिव सैनिकांनी आक्रोश दाखऊन दिले. मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करा आणि राज्यपाल कोश्यारी यांची उचलबांगडी करा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाच्या वतीने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चा काढण्यात आला. यावेळी बहुजन वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी मोर्चात माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, सकल मराठा समन्वयक माऊली पवार, संभाजी आरमार अध्यक्ष श्रीकांत डांगे, राजन जाधव, नाना मस्के, प्रमोद गायकवाड, विजयकुमार हत्तुरे, रॉकी बंगाळे, केरू जाधव, एन के क्षीरसागर, दशरथ कसबे, शांतिकुमार नागटीळक, मिलिंद प्रक्षाळे, सुहास सावंत, पप्पु गायकवाड, रविकांत कोळेकर, गौतम चंदनशिवे, चाचा सोनवणे, एन.के. क्षीरसागर, अनिल वाघमारे, संतोष सोनवणे,पिंटू ढावरे यांच्यासह हजारोंच्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते. यातील अनेकांनी आपल्या मनोगत मधून आक्रोश दाखविला.
काय आहेत मागण्या
देशातील सर्व महापुरुषांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीवर बिगर जामिनीचा गुन्हा दाखल करून त्यांची सुटका न होईल अशा पद्धतीचा नवनिर्मित कायदा करण्यात यावा, भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळातून महाकालपट्टी करण्यात यावी, त्यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई व्हावी, राज्यपाल कोश्यारी यांची उचलबांगडी करण्यात यावी, नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये तसेच इतर ठिकाणी पेन वापर बंद करण्यात आले आहे.
ही बाब विद्वत्तेला हानिकारक असून हा लोकशाही वर मोठा घाला आहे, तरी ही बंदी उठवण्यात यावी, आमदार राम कदम यांच्यावर कठोर कारवाई व्हावी,अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले तसेच शिष्टमंडळाने हे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.