आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Solapur Crime News Two Wheelers Stolen शहरात तीन ठिकाणी दुचाकी चोरीला‎, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

सावधान:शहरात तीन ठिकाणी दुचाकी चोरीला‎, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर‎ शहरातील विविध ठिकाणांहून तीन दुचाकी‎ चोरून नेल्याच्या घटना घडल्या असून,‎ अज्ञात चोरट्यांविरुध्द सदर बझार व‎ फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल‎ झाला आहे. या घटना एप्रिल महिन्यातील‎ असून फिर्याद गुरुवारी दाखल करण्यात‎ आल्या आहेत.‎

जुना विडी घरकुल: विजय मारुती चौक,‎ जुना विडी घरकुल सी-१ ग्रुप येथे बालाजी‎ अंबाजी सामलेटी (वय ३८) यांनी अापली‎ दुचाकी (एमएच १३ बीसी ४८०७) ही लॉक‎ करून ठेवली होती. २८ एप्रिल राेजी रात्री‎ दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद गुरुवारी‎ (दि. ४ राेजी) एमआयडीसी पोलिसात‎ दाखल करण्यात आली आहे.‎

कुठे कुठे झाली चोरी?

चार पुतळा : सचिन सुभाष राठोडे ( वय‎ ३१) यांनी चार पुतळा परिसरात‎ मोटारसायकल( एमएच ४८ एआर ५९३५)‎ हॅण्डल लॉक करून ठेवली होती. अज्ञात‎ चोरट्यांनी २५ फेब्रुवारी रोजी चोरून नेली‎ आहे. गुरुवारी दुपारी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंद‎ झाला आहे. पत्नी आजारी असल्याने फिर्याद‎ देण्यास उशिरा झाला, असे फिर्यादीत म्हटले‎ आहे.‎

निराळे वस्ती : निराळे वस्ती भय्या‎ मित्रमंडळाच्या बाजूला श्रीपाद दिलीप‎ कंदलगावकर (वय २८, मड्डी वस्ती, भवानी‎ पेठ) यांनी दुचाकी (एमएच १३ बीडी ०६८८)‎ लावली होती. ती चोरीला गेल्याची घटना १४‎ एप्रिल रोजी घडली असून ४ मे रोजी फौजदार‎ चावडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला‎ आहे. पत्नी आजारी असल्याने फिर्याद‎ देण्यास उशिरा झाला आहे, असे फिर्यादीत‎ म्हटले आहे.‎