आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राध्यापकाच्या मुलाच्या लग्न जमवण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशीच चोरट्यांनी घरातील 35 हजारांच्या रोख रक्कमेसह सोन्याच्या दागिने असा एकुण 4 लाख 73 हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना उंदरगाव येथे 7 एप्रिलच्या पहाटे 4 च्या सुमारास उघडकीस आली. घराच्या मागील बाजूच्या दाराचे कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश करत बेडरुम मधील लाकडी कपाट तोडून ऐवज लांबविला. पेशाने निवृत्त प्राध्यापक असलेले सुभाष काळे हे कुटूबिंयासमवेत मुलगा सचिन काळे याच्या मुलाच्या टिळ्याच्या कार्यक्रमाची तयारी करून मंगळवारी सायंकाळी झोपले होते. मुलगा सचिनचा अंबाजोगाई येथील मुलीशी लग्नाच्या टिळ्याचा कार्यक्रम बुधवारी दुपारी होता.
दरम्यान या कार्यक्रमाच्या पुर्वसंध्येलाच घरी चोरी झाली. घरातील काही जण हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर तर फिर्यादी सुभाष हे त्यांची पत्नी व मुले हॉलमध्ये झोपले होते. वडील पोर्चमध्ये एकच्या सुमारास झोपले होते. दरम्यान पहाटे चार वाजता जाग आल्यानंतर पाहिले असता घराच्या दारांना बाहेरून कड्या घातल्या गेल्या होत्या. याचवेळी मागील बाजूच्या दाराचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश केल्याचे दिसून आले. आतल्या खोलीत असलेल्या कपाट तोडून त्यातील रोख रक्कम 35 हजार व सोन्याचे दागिने असे 4 लाख 73 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला.
दरम्यान बुधवारी दुपारी पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे आदीसह सोलापूरहून मागवलेले श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे अद्याप लागलेले नाहीत. मुलाच्या लग्नासाठी केलेले दागिने आणि रोख रक्कम हातोहात लंपास केल्याने काळे कुटूंबियांना मोठा आर्थिक फटका बसलाय. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे करीत आहेत.
असा गेला आहे ऐवज
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.