आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:'हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय', आनंद शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांना गाण्याच्या माध्यमातून टोला

सोलापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारच्या प्रचारसभांमध्ये सत्ता बदलाविषयी वक्तव्य केले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकार करण्यासाठी विविध पध्दतींचा वापर केला जात आहे. आता तर थेट ज्येष्ठ पार्श्वगायक आनंद शिंदेंच्या गाण्यातून राष्ट्रवादीचा चांगलाच प्रचार झाला आहे. आनंदर शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना गाण्याच्या माध्यमातून टोला लगावला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारच्या प्रचारसभांमध्ये सत्ता बदलाविषयी वक्तव्य केले आहे. याच वक्तव्याला आनंद शिंदे यांनी गाण्याच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. 'हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापालाही पडणार नाय.' असा टोला त्यांनी गाण्यामधून लगावला आहे.

मित्र भारत भालके यांच्या प्रेमाखातर आनंद शिंदे हे त्यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सोमवारी मंगळवेढ्यात आले होते. आनंद शिंदे देखील मुळचे मंगळवेढ्यामधीलच आहेत. दिवंगत आमदार भारत भालके यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. या मैत्रीखातर मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालेल्या भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी आनंद शिंदेंनी मंगळवेढ्यात हजेरी लावली. या वेळी त्यांनी गाण्याच्या माध्यमातून जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.

काय होते गाण्याचे बोल?

तुम्ही चिडवताय, आम्ही चिडणार नाय, तुम्ही लय काय करताय, तसं काय घडणार नाय, तुम्ही रडवताय, पण आम्ही रडणार नाय हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय

बातम्या आणखी आहेत...