आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सोलापूरच्या अभियंत्याने सर केला खडतर रूपीन पास; भारतातील अवघड हिमालयीन ट्रेक, 15 हजार 196 फूट उंच पर्वत माथा

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील अत्यंत अवघड अशा पहिल्या दहा ट्रेकमध्ये रूपीन पास ट्रेकचा समावेश आहे. हा आंतरहिमालयीन ट्रेक असून, त्याची सुरुवात उत्तराखंड या राज्यातून होते व हिमाचल प्रदेशात तो समाप्त होतो. सोलापुरातील महापारेषणमधील उपकार्यकारी अभियंता अमेय केत यांनी नुकतीच ही मोहीम प्रतिकूल वातावरण असताना सर केली. बेस कॅम्पपासून चढाई करण्यासाठी २२ मे ते २९ मे असा सुमारे सात दिवसांचा कालावधी लागला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय म्हणत तिरंगा फडकावला. या मोहिमेची नोंद इंडियन माउंटेनेरिंग फेडरेशनने घेतली आहे.

समुद्र सपाटीपासून सुमारे ३२४६ मीटर म्हणजे १५ हजार १९६ फूट उंच पर्वत माथा आहे. हा रूपीन पासचा ट्रेक आहे. तो अत्यंत अवघड ट्रेक अाहे. त्यामध्ये निसर्गाची विविध रूपे बदलणारे हवामानाचे दर्शन होते. रूपीन पासचा ट्रेक हा शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक शक्तीचाही कस पाहणारा आहे, असे महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता अमेय केत यांनी सांगितले. येथे कधी साधा पाऊस तर कधी गारांचा, बर्फाळ वारे आणि अधूनमधून उन्हाळ्याची हुलकावणी देणारे ऊन, बर्फाळ कडे अशा खडतर वातावरणाचा सामना करत त्यांनी यशस्वी चढाई केली.

निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद
गिर्यारोहणाची सुरुवात उत्तराखंडमधील धौला-सेवामार्गे हिमाचलमधील झाका-जिसकून-बुरास कांडी-धांदेरास थच-अप्पर वॉटर फॉल ते रुपीन पास सर करून रोंटी गड-सांगला व्हॅली येथे पूर्ण झाला. निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटायला मिळतो आणि त्याच वेळी तो जीव मुठीत धरण्यासही भाग पाडतो.

शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारे, प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्यास शिकवणारे व मानवाला त्याचे क्षुद्रत्व जाणवून देऊन त्याला निसर्गासमोर नतमस्तक होण्यास भाग पाडणारे रूपीन पासचे गिर्यारोहण होते. अमेय केत, उपकार्यकारी अभियंता, महापारेषण, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...