आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी काळवीटाला उपचारासाठी पुण्यात हलवले:रस्त्याचा अंदाज न आल्याने एकाचवेळी तब्बल 12 काळविटांचा झाला होता मृत्यू

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ,

केगाव-हत्तूर बाह्य वळण मार्गावरील उड्डाणपुलावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या एका काळवीटास पुढील उपचारासाठी बावधन (पुणे) येथील रेस्क्यू सेंटरममध्ये उपचारासाठी मंगळवारी (दि. 31) पाठविण्यात आले.

शनिवारी (दि. 28) सायंकाळी रस्त्याचा अंदाज न आल्याने 15 काळविटांचा कळप उड्डाणपुलावरून खाली पडला होता. त्यामध्ये 12 काळविटांचा जागेवर मृत्यू झाला होता. तीन गंभीर जखमींपैकी दोन काळविटांचा मृत्यू झाला. एका जखमी नर काळविटाच्या उजवा पायाचे हाड मांडी पासून तुटून बाहेर आले होते.

वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया केली आहे. मात्र एक पाय पूर्णत: निकामी झाला असून त्यास अद्ययावत उपचार आवश्यकता असल्याने पुण्याच्या रेस्क्यू टीमकडे त्यास सुपूर्द करण्यात आले.

रेस्क्यू सेंटरकडे जखमी काळवीट

रेस्क्यू टीमचे पशुवैद्यक डॉ. तुही सातारकर, डॉ. अमित तोडकर व त्यांच्या पथकाने पुण्याच्या रेस्क्यू सेंटरमध्ये साडेतीन वर्षांचे काळवीट नेले. दोन दिवसांपूर्वी शहराच्या जवळपास गवा आला होता. अचानक तो शहरामध्ये आल्यास त्यास बेशुद्ध करून निसर्गात सोडावे लागू शकल्यास सतर्कता म्हणून पुण्याची रेस्क्यू टिम सोलापुरात आली होती. पण, सोमवारी रात्री गवा मंगळवेढा, सांगोला तालुक्याच्या दिशेने गेल्याने रेस्क्यू सेंटरकडे जखमी काळवीट उपचारासाठी पाठविण्यात आले.

शर्थीचे प्रयत्न सुरु

सोलापूरच्या वनपरिक्षेत्राचे अधिकारी दीपक खलाणे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, वनविहारातील वन्यजीव अधिवास उपचार केंद्रात जखमी काळविटावर उपचार केले. त्या दुर्घटनेत वाचलेल्या एकमेव जखमी काळवीटास वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पण, प्रकृती नाजूक असल्याने सतत पशुवैद्यकाच्या निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक असल्याने पुण्याच्या रेस्क्यू सेंटरमध्ये पाठविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...