आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पाचव्या मॅरेथॉन स्पर्धेचे सोलापुरात आयोजन:रनर्स असोसिएशनचा पुढाकार

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रनर्स असोसिएशनच्या वतीने रविवारी 8 जानेवारी रोजी आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून या मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर शनिवार 7 जानेवारी रोजी नूमवि प्रशालेमध्ये मॅरेथॉन एक्स्पोचे भरवण्यात आलेला आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंना याच एक्स्पो मध्ये टीशर्ट आणि किटचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. स्वप्निल कोठाडिया आणि आपटे डेअरीचे संचालक अभिषेक आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या 5 वर्षापासून जानेवारी महिन्यातील पहिल्या रविवारी सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने सोलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. मॅरेथॉनमुळे सकाळी काही मार्गावरील वाहतुकीमध्ये दरवर्षी प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे. असेही यावेळी सांगण्यात आले. ​

बक्षिसे आणि वैशिष्ट्ये

  • आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉमध्ये सर्वच वयोगटातील स्त्री आणि पुरूष धावपटूंसाठी 32 प्रकारचे बक्षिसे दिली जाणार आहेत. सोलापूरकरांचे
  • कौतुक व्हावे यासाठी 32 पैकी 16 बक्षिसे ही सोलापूरकरांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत. स्पर्धा पार पडल्यानंतर सकाळी 9.30 वा.
  • मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर करण्यात येणार आहे.
  • यंदाच्या आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉन मधून कचरा विलगीकरणसंदर्भात जनजागृती करणार आहे.
  • 60 वर्षाच्या पुढील 7 धावपटूंचा 21 किमी मध्ये सहभाग
  • सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मॅरेथॉमध्ये सहभाग
  • सोलापूरच्या जागरूक डॉक्टराकडून गेल्या 5 वर्षापासून अत्यंत नियोजनबध्द आणि नेटकेपणाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन
  • मॅरेथॉन मार्गावर 11 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओआरएस, वैद्यकीय मदत केंद्र, 3 ठिकाणी फिरते बायो टॉयलेटची सुविधा
बातम्या आणखी आहेत...