आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:सासरच्या जाचाला कंटाळून दोन लेकरांना उशीने‎ दाबून केले ठार, नंतर स्वतः केली आत्महत्या‎

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्व नगर येथे दोन लेकरांना उशीने‎ दाबून ठार करून आत्महत्या‎ केल्याप्रकरणी विजापूर नाका‎ पोलिसांनी पती सुहास चव्हाण, दीर‎ सुशांत चव्हाण, सासू मंगल चव्हाण,‎ नणंद सोनू जाधव आणि जाऊ रेखा‎ चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला‎ आहे.

मृत ज्योती चव्हाण यांचे पती‎ सुहास यास न्यायदंडाधिकारी यांनी एक‎ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.‎ मृत ज्योती यांचे वडील दीपक‎ व्यंकटराव गायकवाड यांनी विजापूर‎ नाका पोलिसांत फिर्याद दाखल केली.‎

त्यानुसार पती, दीर, सासू आणि नणंद हे‎ मृत ज्योती हिच्या चारित्र्यावर संशय‎ घेत होते आणि पती हा तिला सतत‎ मारहाण व शिवीगाळ करत होता. या‎ सर्व जाचास कंटाळून ज्योती यांनी‎ टोकाचे पाऊ उचलले. दोन्ही मुलांना‎ ठार मारून स्वतः आत्महत्या केली.‎

शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी‎ पारशेट्टी यांनी आरोपीस ७ मे पर्यंत‎ पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश‎ केला. यात पोलिस अधिकारी बी. एम.‎ देशमुख हे तपास करत आहेत. सरकार‎ पक्षातर्फे अॅड. सार्थक चिवरी तर‎ आरोपींतर्फे अॅड. अभिषेक गुंड आणि‎ अॅड. मनोहर गोविंदे यांनी काम पाहिले.‎