आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नुकतेच साेलापूरच्या दाैऱ्यावर येऊन गेले. त्या वेळी महेश काेठे, सुधीर खरटमल आणि अॅड. यू. एन. बेरिया ही मंडळी बालाजी सराेवर हाॅटेलवर भेटली हाेती. त्याला चार दिवस उलटले नाहीत ताेवरच ही मंडळी पुन्हा ‘सिल्व्हर ओक’वर धडकली.
गुरुवारच्या भेटीत पक्षातील शहराध्यक्षपद अाणि लाेकसभा निवडणुकीतील उमेदवार याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. त्याने श्री. पवार हे साेलापूरची भाकरी फिरवणार का? याकडे अाता लक्ष लागले अाहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर गुरुवारी निकाल झाला अाणि त्याच दिवशी ‘सिल्व्हर अाेक’वर साेलापूरच्या राष्ट्रवादी पक्ष संघटनेबाबत महत्त्वाची चर्चा सुरू हाेती.
शहराध्यक्षपद खरटमल यांना देण्याचे निश्चित झाल्याचे सांगण्यात अाले. शिवाय लाेकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला अाल्यास खरटमल यांनाच संधी देण्याचे ठरले, असेही सूत्रांनी सांगितले. परंतु पक्षातील निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या मंडळींना अशी पदे मिळतील का? मिळाली तरी निष्ठावंतांच्या नाराजीचे काय करणार? असे प्रश्न निर्माण हाेऊ शकतात.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद , लाेकसभा उमेदवार ठरवण्यासाठी चर्चा
साेलापूरच्या या मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अादिती नलावडे यांचीही भेट घेतली. तिथे शहरातील जबाबदारी कुणाकडे द्यावी, यावर चर्चा झाली. जुन्या निष्ठावंतांची अाणि नवख्यांची सांगड घालूनच खांदेपालट करण्यात येईल, असे अादिती नलावडे म्हणाल्या.
या चर्चेत शहराध्यक्षपदासाठी श्री. खरटमल यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगताना पुढील १५ दिवसांत त्याची अधिकृत घाेषणा हाेईल, असेही सूत्र म्हणाले. खरटमल काँग्रेसमध्ये असताना शहराध्यक्षपद सांभाळले हाेते. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक हाेते.
काँग्रेस शहराध्यक्ष पदातून मुक्त हाेताना, त्यांनी कुणाबद्दल तक्रारही केली नाही. त्यानंतर ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर गेले. काँग्रेसमधील इतर सहकाऱ्यांनाही साेबत घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये त्यांचे बळ वाढले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.