आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात फिल्मीस्टाइल दरोडा:एकाने चाकू धरला, 3 दरोडेखोरांनी कपाटातून ऐवज लुटला

संदीप शिंदे |माढा, सोलापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापुरात चाकुचा धाक धाकवत लुटमारीची घटना घडली आहे. घराच्या हॉलचा दरवाजा जोराने धक्का मारुन तोडत घरात प्रवेश करुन चाकू व लाकडी दांडक्याचा धाक दाखवून चौघांनी आरडा-ओरड केली, तर मारुन टाकीन अशी धमकी देवून सोन्या चादिंच्या दागिन्यासह रोख ५० हजार रक्कम असा एकूण २ लाख १७ हजार ३५० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना माढा तालुक्यातील उंदरगाव मध्ये ३ ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे.

अनिता अच्युत तांबिले यांनी माढा पोलिसांत तक्रार दिल्यानुसार अनोळखी 4 जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गावातीलच स्वप्नील तांबिले, सुमन नाईकवाडे यांच्या घरी देखील चोरी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

एकूण २ लाख १७ हजार ३५० रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. अनोळखी चार चोरट्यांनी घराच्या हॉलचा दरवाजा जोराने धक्का मारून तोडून घरात प्रवेश करून चाकू लाकडी दांडक्याचा धाक दाखवून तसेच आरडाओरडा केला तर मारुन टाकीन अशी धमकी देऊन जबरदस्तीने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे.घटनेचा अधिक तपास स.पो निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहम्मद शेख करीत आहेत.

एकाने चाकू धरला, तिघांनी कपाटातून ऐवज लुटला

फिर्यादी अनिता तांबिले यांचे पती अच्युत तांबिले हे वडशिंगे शाळेत कर्मचारी म्हणुन कार्यरत आहेत. नुकतेच त्यांची हृदय विकाराची शस्त्रक्रिया झाली असल्याने ते आराम करीत होते. ३ ऑक्टोबरला रात्री जेवणकरुन तांबिले कुटूंब झोपल्या नंतर घरात चौघा चोरट्यांनी प्रवेश करुन एका चोरट्यांने तांबिले कुटूबांतील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून मारुन टाकण्याची धमकी देऊन त्यांच्या समोर उभा राहिला. तर इतर तिघांनी कपाटाचे कुलूप तोडून ऐवज लांबविला.

बातम्या आणखी आहेत...