आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर जिल्ह्यातील माढा येथील यात्रेत ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्याचा मान मिळावा यासाठी एका शेतकऱ्याने चक्क 55 हजारांची बोली लावत मानकरी ठरल्याचा प्रकार पहायला मिळाला.
मानपानासाठी आणि आपण कसे तालेवार हे सांगणयासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. सोलापुरात असाच एक प्रकार पहायला मिळाला. यात्रेतील ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्याचा मान मिळावा म्हणमन सोलापूरच्या माढा येथे भरलेल्या यात्रेत बोली लागली. किमतीवर किमती वाढल्या अन 55 हजारांची बोली लावत एका पठ्ठ्याने चक्क नारळ फोडण्यासाठी 55 हजार रुपये मोजले. त्यामुळे या बोलीची पंचक्रोशीत चर्चा आहे.
माढा तालुक्यात केवड गावातील ही घटना आहे. भगवान लटके या शेतकऱ्याने यात्रेतील ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी चक्क 55 हजारांची बोली लावली. नारळ फोडण्यासाठीची सर्वात मोठी बोली लावल्याने त्यांना नारळ फोडण्याचा मान मिळाला. केवड गावात श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ही बोली लावण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
बोलीची सर्वत्र चर्चा महाराष्ट्रात सध्या यात्रा जत्रांचा हंगाम सुरू झालाय. कुठे ऑर्केस्ट्रा तर कुठे तमाशा तर कुठे मैदानी खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. एरवी राजकीय पदासाठी होणारी बोली अनेकांनी पाहिली असेल. मात्र, माढयाच्या यात्रेतील या अजब बोलीची सर्वत्र चर्चा रंगलीय.
गावकऱ्यांचा जल्लोष
केवड गावात काळभैरवनाथ यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. याचे उद्घाटन गावकऱ्यांनी एकत्र येऊन केले. यावेळी उद्घाटनाचा नारळ फोडण्याचा मान कोणाचा यावर गावकऱ्यांची बोली लागली. किमती वाढत गेल्या. भगवान लटके या शेतकऱ्याने 55 हजारांची बोली लावत नारळ फोडण्याचा मान पटकावला. यावेळी गावकऱ्यानी त्याचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. गावकऱ्यांनी खांद्यावर बसवून एकच जल्लोष केला. नारळ फोडण्याचा क्षण काही सेकंदाचा असला तरीही मानपानाच्या बाबतीत गावकरी काहीही करू शकतात याचेच हे उदाहरण आहे.
ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात नारळ फोडण्यासाठी बोली लागणारे सोलापूर जिल्ह्यातील केवड हे राज्यातील पहिले गाव ठरलेय. गावकऱ्यांनी या अजब लिलावाचा व्हिडीओही तयार केलाय.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.