आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षता सोहळा:सत्यम...सत्यम..दिड्डम...दिड्डम.....अन् उंचावले भाविकांचे हात

संजय जाधव | सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या उत्सव सोहळ्यातील आजचा प्रमुख सोहळा म्हणजे अक्षतासोहळा. हा सोहळा समती कट्टा येथे गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमाराला पार पडला. कोरोना संकटामुळे फक्त मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

संमतीवाचन, सुगडी पूजनानंतर, सिद्धेश्वर महाराज योगदंडाची पूजा आणि अक्षता सोहळा विधी पार पडला. हा सोहळा अतिशय मांगल्य व पवित्र अशा अपूर्व उत्साहात पार पडला.​​​सत्यम...सत्यम..दिड्डम...दिड्डम.....उच्चारताच अक्षतासाठी भाविकांचे हात उंचावले होते.