आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महापालिका निवडणूक:महिला आरक्षणात बदल नाही; 113 जागांपैकी 57 जागा महिलांसाठी राखीव

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर महापालिकेत निवडणुकीची जोरदार तयारी सुरूय. पालिकेच्या 113 जागांपैकी 57 जागी महिला आरक्षण पडले असून, त्यावर निवडणूक आयोगाने सूचना व हरकती मागवल्या होत्या. प्रभाग क्रमांक 24 साठी एक हरकत होती. मात्र, त्याची दखल न घेता यापूर्वी काढलेले आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.

एक हरकत दाखल

महापालिका निवडणुकीसाठी 38 प्रभाग असून्, 1 ते 37 प्रभागात तीन सदस्य, तर 38 व्या प्रभागात 2 सदस्य आहेत. 113 सदस्यापैकी 57 सदस्य महिला असतील. त्यात अनुसूचित जातीचे 8, अनुसूचित जमातीचे 1 आणि सर्वसाधारण 48 सदस्यांचा समावेश आहे. दोन जून रोजी आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर महापालिकेने सूचना व हरकती मागवल्या. त्यावर प्रभाग 24 मधील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येबाबत एक हरकत आली. ती दप्तरी दाखल केल्याची माहिती निवडणूक शाखेचे सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांनी दिली.

प्रारूप मतदार यादी

यापुढील निवडणूक प्रक्रिया ही मतदार यादी तयार करणे आहे. 31 मे 2022 पर्यंत नोंदणी झालेले मतदार पालिका निवडणुकीसाठी पात्र असतील. त्यानुसार प्रभाग निहाय मतदार यादी तयार करण्यात येत आहे. 17 जून रोजी मतदार प्रारूप यादी प्रसिध्द करण्यात आली. 13 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

बातम्या आणखी आहेत...