आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका आयुक्तांविरोधात कामगार आक्रमक:संपाविरोधात नोटीस दिल्यास आयुक्तांसमोरच होळी करण्याचा इशारा

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी नगरसेवकांनी आयुक्तांचा सत्कार केला. - Divya Marathi
माजी नगरसेवकांनी आयुक्तांचा सत्कार केला.

महापालिका आयुक्तांच्या विरोधात पालिका कर्मचाऱ्यांनी संप पुकारुन गुरुवारी मोर्चा काढला होता. त्यावर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊ, अशी भूमिका पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतली. याविरोधात कामगार संघटनांनीही आक्रमक भूमिका घेत नोटीस दिली तर नोटीशीची आयुक्तांसमाेरच होळी करु, असे सांगितले आहे.

सरसकट कारवाई नको

पालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी सांगितले की, आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना अंत पाहू नये. अन्यथा उद्रेक होईल. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांची रजा मंजूर करा. आम्ही काम केले नाही तर वेतन मागत नाही रजा मागतोय. दरम्यान, एकीकडे पालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना इशारा दिलेला असताना माजी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांची प्रशंसा करत त्यांचा सत्कार केला. सरसकट सर्व कर्मचाऱ्यांवर कारवाई नकाे, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.

संपातील कर्मचारी बिनपगारी

संपात सहभागी कर्मचाऱ्यांना बिनपगारी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. रजा मंजूर केल्यास त्यांना वेतन द्यावे लागेल. त्यामुळे बिनपगारी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. संपातील कर्मचाऱ्यांच्या नावाने यादी करण्यास पालिका सामान्य प्रशासनास अडचण येत आहेत. दुसऱ्या दिवशीही यादी तयार नव्हती. बायोमेट्रीक्स हजेरी लावली पण प्रत्यक्षात कामावर हजर नाहीत त्यांची यादी करण्यास अडचण येत आहे.

आयुक्तांचा सत्कार

एकीकडे कर्मचारी आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करत असताना दुसरीकडे माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी यांनी पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा सत्कार केला. सरसकट कर्मचाऱ्यांवर कारवाई करु नका. जे कामचुकार आहेत त्यांच्यावर कारवाई करा. झाडूवाल्यावर कारवाई नको, अशी भूमिका चंदनशिवे यांनी आयुक्तांच्या सत्कार प्रसंगी मांडली.

बातम्या आणखी आहेत...