आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवेढा:उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून कोयत्याने मुलीच्या सासऱ्याचा खून; सहा संशयितांना अटक

मंगळवेढा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी रात्री मुढवीत घडली घटना

मुलीच्या दिराला दिलेले उसने पैसे देण्या-घेण्याच्या कारणातून झालेल्या भांडणावेळी सहा जणांनी कोयत्याने हल्ला करून त्याच्या वडिलांचा खून केला. निष्ठूरपणे त्याच्या अंगावर नाचले. रविवारी (दि. २३) रात्री नऊच्या सुमारास मुढवी येथे ही घटना घडली. अंबादास एकनाथ रोकडे (वय ६५, रा. मुढवी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्या सहाजणांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दत्तात्रय दिगंबर कदम, सीताराम दत्तात्रय कदम, सागर प्रकाश कदम, प्रशांत ऊर्फ भय्या शंकर लवळे, नागनाथ अंबादास रोकडे, राणू नागनाथ रोकडे (सर्व रा. मुढवी) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. यातील संशयित राणू ही दत्तात्रय याची मुलगी आहे. दत्तात्रय याने तिचा दीर फिर्यादी वैजिनाथ अंबादास रोकडे यास उसने पैसे दिले होते. ते पैसे त्याने परत मागितले होते. त्यावरून आठ दिवसांपूर्वी वैजिनाथ हे राणू हिला काही बोलले होते. त्या रागातून दोन पिकअपचे हेडलाईट फुटल्याचे दिसत आहे.

मोटारसायकलवरून संशयित हे हाती कोयता घेऊन वैजिनाथ याच्या घरी गेले. माझ्या मुलीला तू काय म्हणाला? असे म्हणत दत्तात्रय याने शिवीगाळ करत त्यांच्या मानगुटीवर मारले. सीताराम व सागर यांनी त्यांना लाथाबुक्क्या मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी चुलीजवळील दगडी वरवंटा सीताराम याच्या डोक्यात मारला. पण त्याने तो चुकवला. तेव्हा दत्तात्रय याने भिंतीजवळ ठेवलेल्या कोयत्याने त्यांच्या उजव्या मांडीवर वार केला. त्यांची आई व पत्नी सोडवण्यास आले. त्याने त्यांच्या आईच्या तोंडावर लाथ मारली.

सीतारामने त्यांना ढकलून दिले. तर भाऊ नागनाथ, भावजय राणू या दोघांनी तेथे येऊन वैजिनाथ यास शिवीगाळ केली. नागनाथनेही आईला ढकलून दिले. तेव्हा त्यांचे वडील हाताने त्यांना खाणाखुणा करीत होते. ते पाहून संशयितांनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याचा वार केला. तसेच अंगावर नाचल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३२६, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला.

अंगावर नाचल्याने आतडे निकामी
अंबादास रोकडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जवळपास तीन तास चालले. लकवा मारल्याने ते वर्षभरापासून अंथरुणाशी खिळून होते. केवळ त्यांनी हातवारे केल्याच्या रागातून संशयितांनी त्यांच्यावर कोयत्याचा वार केला. शिवाय त्यांच्या अंगावर नाचले. त्यामुळे त्यांच्या पोटातील आतडे निकामी झाले. तसेच कोयत्याने डोक्यावर वार केल्याने मेंदूत रक्त साकळल्याचे त्यात आढळले.

बातम्या आणखी आहेत...