आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Solapur। NCP Leader Babanrao Shinde Ready To Resign As MLA Demanding Written Order Cancelling Ujani Dam Water Distribution Madha News And Updates

...आमदारकीपेक्षा पाणी महत्वाचे:बबनराव शिंदेंनी दिला राजीनाम्याचा इशारा! उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द झाल्याचे लेखी आदेश जारी करण्याची मागणी

माढा2 महिन्यांपूर्वीलेखक: संदीप शिंदे
  • कॉपी लिंक

माढ्यात राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी उजनी पाणी प्रश्नी लेखी आदेशाची मागणी करताना राजीनाम्याचा इशारा दिला आहे. इंदापूरला जाणार्‍या पाच टीएमसी पाण्याचा आदेश रद्द केल्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. मात्र केवळ घोषणा न करता लेखी आदेश काढावा. अन्यथा आमदारकीचा राजीनामा देऊ अशी भूमिका माढ्याचे आमदार बबनराव शिंदेनी घेतली आहे.

इंदापूरला उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. त्यावरून गेल्या महिनाभरापासून सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू आहेत. यावर मत-मतांतरे सुद्धा आहेत. त्यानंतर वाढता विरोध पाहता, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इंदापूरला 5 टीएमसी पाणी देण्याचा आदेश रद्द केल्याची घोषणा केली. पण, आदेश रद्द करण्याची केवळ घोषणा देऊन चालणार नाही, त्या स्वरुपाचे लेखी आश्वासन द्या असा पावित्रा आमदार बबनराव शिंदे यांनी घेतला आहे.

आमदारकीपेक्षा उजनीचे पाणी महत्वाचे आहे असे दिव्य मराठीशी बोलताना शिंदेनी सांगितले. पक्षावर माझा विश्वास आहे. हे 5 टीएमसी पाणी उजनी धरणातून उजनी न करता पुणे आणि पिंपरी चिंचवडचे घाण पाणी पुण्याजवळ बंधारा बांधून तेथून खडकवासला कॅनलमध्ये टाकावा. त्याला विरोध असायचे कोणाचेही कारण नाही. माझी ही याला पूर्ण सहमती आहे. वास्तविक पाहता दौड व बंडगार्डन या दोन ठिकाणी पाणी मोजण्याची व्यवस्था आहे. दरवर्षी ऑक्टोबरपासून जूनपर्यंत साधा एकही थेंब पुण्यातून उजनी धरणात येत नाही. त्याची तशी नोंद ही उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत उजनीतून 5 टीएमसी पाणी नेण्याबद्दल आदेश काढले. हा निर्णय निश्चितच सोलापूरच्या स्थानिकांसाठी अन्यायकारक आहे असेही ते पुढे म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...