आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डेमय बिकट वाट:सोलापूरमध्ये रस्ते दुरुस्तीसाठी माजी नगरसेवकाचे व्यापाऱ्यांसह आंदोलन; आयुक्तांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या मध्यवर्ती भागात बाजारपेठ असलेल्या कुंभारवेस ते जोडभावीपेठेकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यामुळे दैना झाली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांसह शनिवारी चार तास रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन केले.

आंदोलकांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात करत अधिकाऱ्यांचा निषेध केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

चांगला रस्ता खोदला

कुंभारवेस परिसर बाजारपेठ असून, तेथे नागरिकांची वर्दळ असते. जुना आडत बाजार आहे. तेथे यापूर्वी माजी नगरसेवक उदय चाकोते यांनी पदावर असताना दीड कोटीचा रस्ता केला. तो रस्ता खोदून स्मार्ट सिटी कंपनीने ड्रेनेजलाइन टाकली. त्यानंतर रस्ता पूर्ववत करणे आवश्यक होते. मात्र, काम केले नाही.

वाहतूक वळवली

रस्ता दुरुस्ती करा, या मागणीसाठी माजी नगरसेवक सुरेश पाटील, बापीन पाटील यांच्यासह त्या परिसरातील व्यापारी आणि भाजपचे कार्यकर्ते यांनी कुंभारवेस येथे दोन तास ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. मात्र, आंदोलन जाग्यावरून हालले नाहीत.

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

महापालिका अधिकारी येत नसल्याने पोलिसांनी आंदोलनकांना समजावून सांगितले. तरीही आंदोलन सुरूच असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जोडभावी पोलिस ठाण्यात नेऊन सोडले. यावेळी कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ त्र्यंबक ढेगळे यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

आयुक्त पुणे दौऱ्यावर

रस्त्यासाठी आंदोलन सुरू असताना महापालिका आयुक्त पी. शिवशंकर पुणे येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी गेले होते. अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे शहरात नव्हते यासह अन्य अधिकारी दाद दिले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले.

आंदोलकांनी निषेध म्हणून महापालिका आयुक्तांचा पुतळा जाळला. पोलिसांनी अटक केल्याने आंदोलन थांबवण्यात आले. यापुढील काळात तो रस्ता नाही केल्यास महापालिकेत व्यापाऱ्यासह येऊन आंदोलन करणार. आयुक्तांना कार्यलयात येऊन देणार नाही.

- सुरेश पाटील, माजी नगरसेवक

बातम्या आणखी आहेत...