आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:आजारी लेकीला पाहण्यासाठी तिच्या घरी आली होती आई, अंगावर छत कोसळून झाला मृत्यू; मुलगी थोडक्यात बचावली

माढा, सोलापुर (संदीप शिंदे)18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलगी थोडक्यात बचावली,आई दगावली

मुलगी आजारी असल्याने तिला पाहण्यासाठी आलेल्या आईच्या अंगावर खणाचे छत पडल्याने काळाने झडप घातल्याची घटना घडली आहे. निलावती शहामुर्ती चव्हाण (वय-६५,रा.भेंड ता.माढा) असे छत अंगावर पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना 1 ऑक्टोबरच्या रात्री 12.30 च्या सुमारास शेटफळ गावात घडली. मृत निलावती यांचा मुलगा माढा शहरात असल्याने अनिल चव्हाण यांनी माढ्यात आईला आणून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.

अनिल चव्हाण यांनी फिर्याद दिल्यानुसार घटनेची नोंद माढा पोलिसांत झाली आहे. निलावती चव्हाण यांची मुलगी छाया रमेश दांडगे आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी गुरुवारी दुपारी मोहोळ तालुक्यातील शेटफळमध्ये आल्या होत्या. मुलीच्या घरीच मुक्काम करुन त्या शुक्रवारी सकाळी भेंड गावी जाणार होत्या. मात्र निलामती या मुलीसमवेत गुरुवारी रात्री झोपल्या असता खानाचे मालवद अंगावर पडुन 1 ऑक्टोबर च्या रात्री 12.30 च्या सुमारास जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

मुलगी थोडक्यात बचावली,आई दगावली
छाया दांडगे या आपल्या मुलीला पाहण्यासाठी आलेल्या आई निलावती या मुली समवेत जेवण करुन आईला फॅनचा वारा सहन होत नसल्याने (दम्याचा त्रास असल्याने)आई समवेत माळवादच्या खोलीत झोपल्या होत्या. आईच्या अंगावर एकदमच माळवाद पडले. इतक्यात खडबडून जाग्या झालेल्या छाया पटकन बाजुला सरल्याने थोडक्यात बचावल्या आहेत. काळजाचा ठोका उडवणारी घटना सांगताना मुलगी छाया ओक्सा बोक्शी रडल्या.

बातम्या आणखी आहेत...