आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकारण-राजकारण:सोलापूरकरांचा रोष घालवण्यासाठी मामांची पुन्हा पीपीई किट स्टंटबाजी; कोरोना राहिला बाजूलाच, पालकमंत्र्यांनी उजनीच्या पाण्यावरच दिले स्पष्टीकरण

अक्कलकोट12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक मेपासून एकूण 100 खाटांची सुविधा देणार, दोन खासगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटलची दिलीय मान्यता

पंढरपूरची पाेटनिवडणूक अाणि अाचारसंहितेचे कारण देत, तब्बल २२ दिवस साेलापूरकडे पाठ फिरवणारे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विराेधात लाेकांमध्ये प्रचंड राेष अाहे. शहर अाणि ग्रामीण भागाला काेराेना संसर्गाने चाेहाे बाजूने घेरलेले असताना रेमडेसिविर या इंजेक्शनसाठी लाेकांची वणवण असताना, अाॅक्सिजनचे बेड उपलब्ध नसताना पालकमंत्री गेले कुठे? असा सामान्यांचा संतप्त सवाल हाेता. हा राेष निवळण्यासाठी श्री. भरणे यांनी पीपीई किट घालून शासकीय रुग्णालयातल्या काेविड वाॅर्डात जाण्याची स्टंटबाजी केली. गेल्या वर्षी लाॅकडाऊन काळातही त्यांनी असाच प्रकार केला हाेता.

अखेर रविवारी भरणे माध्यमांसमाेर अाले. परंतु त्यांचाच संताप एेकावा लागला. त्याचे कारण उजनीचे पाणी इंदापूरला पळवल्याचे प्रकरण. काेराेनाला बाजूला सारत त्यांनी त्यावर लंबेचाैडे स्पष्टीकरण दिले. म्हणाले, ‘‘इंदापूरला पाणी नेल्याचे सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन.’’ या प्रकरणावरून ते भलत्याच तणावात हाेते. शनिवारी रात्री शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम हाेता. बाहेर नकाे तितका बंदाेबस्त हाेता. दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, गटविकास अधिकारी भास्कर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पात्रुडकर, मुख्याधिकारी एन. के. पाटील, सभापती रत्नमाला पोतदार, अजिंक्यराणा पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, सोमेश क्षीरसागर, नागेश वनकळस, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबर, डॉ. बालाजी गवाड आदी उपस्थित होते.

सेंटर उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे भरणे म्हणाले.
या वेळी आमदार यशवंत माने, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, गटविकास अधिकारी भास्कर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पात्रुडकर, मुख्याधिकारी एन. के. पाटील, सभापती रत्नमाला पोतदार, अजिंक्यराणा पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, सोमेश क्षीरसागर, नागेश वनकळस, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबर, डॉ. बालाजी गवाड आदी उपस्थित होते.

पाटील काळ्या कपड्यात पाेलिसांनी घेतले ताब्यात
रविवारी श्री. भरणे यांनी सात रस्त्यावरील नियाेजन भवनमध्ये अधिकाऱ्यांची अाढावा बैठक घेतली. लाेकप्रतिनिधींना निमंत्रण हाेते. परंतु त्यांचीही कसून तपासणी झाली. माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारला. अशा वातावरणात ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील अाले ते काळ्या रंगाच्या वस्त्रांमध्येच. पाेलिसांनी त्यांना विचारले, ‘कुणाचा निषेध करण्यासाठी अाला?’ पाटील म्हणाले, ‘निषेध कसला. माझ्या कपड्यांचा रंगच काळा अाहे. इतकेच काय माझे ताेंडदेखील काळेच अाहे.’ हा सुसंवाद विसंवादात गेला अाणि पाेलिसांनी पाटलांना ताब्यात घेतले.
काेराेना उपचारावर पालकमंत्री म्हणाले

थेट रुग्णांशी संवाद
अाढावा बैठक झाली. पत्रकार परिषदेनंतर भरणे यांनी शासकीय रुग्णालयाच्या काेविड वाॅर्डाला भेट दिली. त्यांना रुग्णांशी संवाद साधायचा हाेता. त्यामुळे पीपीई कीट मागवून परिधान केले. साेबत वैद्यकीय अधिकारी हाेते. परंतु अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर बाहेरच थांबले हाेते. भरणे अात जाऊन थेट रुग्णांना भेटले. ‘कसे अाहात? बरे अाहात ना, घ्या काळजी...’ असे म्हणत दीड मिनिटांत फेरी संपवली. शेवटी एका तरुण रुग्णाने सांगितले, ‘अाम्हाला लहान मुलाला जपावे, त्याप्रमाणे इथल्या लाेकांनी काळजी घेतली.’ त्यांचे हे वाक्य एेकून भरणे बाहेर पडले. पुन्हा माध्यमांसमाेर येऊन म्हणाले, ‘‘उपचारात रुग्ण समाधानी अाहेत.

रेमडेसिविर : या इंजेक्शनचा तुटवडा हाेता. त्याच्या उत्पादकांची बैठक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली. तीत उत्पादित सर्व इंजेक्शन प्राधान्याने महाराष्ट्रातील रुग्णांनाच देण्याचे ठरलेले अाहे.
त्या ग्रामस्थांसारखे इतरांनी अधिक दक्ष राहावे
लस : सुरुवातीला लसीच्या कुप्या माेठ्या प्रमाणात साेलापूरला उपलब्ध झाल्या. परंतु त्याला फारसा प्रतिसाद नव्हता. जेव्हा रांगा लागल्या, त्या वेळी तुटवडा निर्माण झाला. लवकरच लस उपलब्ध हाेतील.

बातम्या आणखी आहेत...