आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेलापूर:माेदींच्या पाया पडू, काहीच नाही मिळाले तर काठी न् घोंगडं घेऊन रस्त्यावर उतरू! सोलापुरातील मेळाव्यात सर्वपक्षीय नेत्यांचा निर्धार

साेलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाऊ. पाया पडू. अन् तरीही काहीच मिळाले नाही तर काठी आणि घोंगडं घेऊन रस्त्यावर उतरू, अशा शब्दांत ओबीसी राजकीय आरक्षणाचा निर्धार मंगळवारी करण्यात आला.

ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी साेलापुरात निर्धार मेळावा झाला. या मेळाव्यास राज्याचे आेबीसी कल्याण तथा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आले हाेते. सत्तेची झूल बाजूला ठेवून, ओबीसीसाठी कुठेही जायला तयार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. मंचावर भाजपचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हाेते. त्यांच्याकडे निर्देश करून ते म्हणाले, पंतप्रधान माेदींकडे घेऊन जाण्याची तयारी करा. आम्ही येऊ. पाया पडू. विनंती करू. शेवटी काही मिळालेच नाही तर धनगरी भूमिका आहेच, काठी न् घाेंगडं घेऊन रस्त्यावर उतरू.

ते पुढे म्हणाले, ‘ब्रिटिशांची सत्ता जाऊन ७५ वर्षे हाेत आहेत. परंतु भटक्या विमुक्तांना अद्याप स्वमालकीची घरे नाहीत. ज्या अठरापगड जातींनी छत्रपती शिवाजी महाराजांना संरक्षण दिले, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून महाराजांनी लढ म्हणण्याचे बळ दिले हाेते. परंतु आताचे महाराज, ‘तुमच्यातून काही द्या...’ अशी मागणी करताहेत. आमच्याच ताटातली भाकर ते घेऊ पाहत आहेत. राजकीय आरक्षण यातूनच गेले. ही गप्प बसण्याची वेळ नाही. लढण्याची वेळ आलेली आहे. माझी आमदारकी, मंत्रिपद यापेक्षाही ही लढाई मला महत्त्वाची वाटते. शहीद हाेण्याची तयारी आहे. पण, बहुरूप्याच्या पाेराच्या अंगावर उसनवारी केलेली खाकी वर्दी नव्हे, तर त्याला पाेलिस अधिकारी म्हणून पाहायचे आहे. त्या दृष्टीने ओबीसी कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक याेजना राबवण्यास सुरुवात केली.’

दरम्यान, मंचावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हजेरी लावली हाेती. पक्षविरहित भूमिकेतून आेबीसी आरक्षण मिळवण्याचा निर्धार काँग्रेस व भाजप नेत्यांनी केला. त्यासाठी दिल्लीत धडक मारण्याचे संकेतही त्यांनी दिले. भटक्या विमुक्तांच्या मुक्तिदिनाचे आैचित्य साधून हा मेळावा झाला. त्यासाठी राज्यभरातून ओबीसी घटकांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते. मंचावर मानेंना बाेलण्याची संधी नसल्याने ते नाराज हाेऊन मंचावरून उठून निघाले हाेते. त्या वेळी विजय वडेट्टीवार यांनी स्वत: त्यांना बाेलावले. बाेलण्यास सांगितले.

हा मेळावा झाला. त्यासाठी राज्यभरातून आेबीसी घटकांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते. मंचावर मानेंना बाेलण्याची संधी नसल्याने ते नाराज हाेऊन मंचावरून उठून निघाले हाेते. त्या वेळी विजय वडेट्टीवार यांनी स्वत: त्यांना बाेलावले. बाेलण्यास सांगितले.

लक्ष्मण मानेंना बावनकुळेेंनी सुनावले खडे बोल
“ओबीसी असूनही देशात माेदी राज्य करत नाहीत. नागपुरातून संघच राज्य करत आहे. ब्राह्मणांच्या हाती सत्तासूत्रे आहेत. त्यामुळे आेबीसींचे प्रश्न मागे पडले.’ लक्ष्मण मानेंची ही टिप्पणी बावनकुळेंना रुचली नाही. “हा राजकीय मंच नाही. ओबीसीसाठी एखादा मंत्री रस्त्यावर येत असेल तर पाठिंबा देण्यासाठी मी आलाेय. त्यामुळे कुणावर टीकाटिप्पणी करून आेबीसी चळवळीला बदनाम करू नका,’ असे खडे बोल बावनकुळेंनी सुनावले.

बातम्या आणखी आहेत...