आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा,  मंदिराच्या आवारात अश्वाचे रींगण; पाहा फोटोज

सोलापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुपारी मंदिराच्या आवारात अश्वाचे रींगण झाले.

परंपरा नुसार पालखी सोहळा असता तर आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला असता. सराटी-अकलूज येथे नीरा नदीत पादुकांना स्नान व सदाशिवराव माने विद्यालयच्या मैदानावर रींगण सोहळ्याची प्रथा आहे. यावर्षी देखील इंद्रायणी नदीत नीरा नदीतून हंडा भरुन आणलेल्या पाण्याने पादुकांना स्नान घालण्यात आले. त्या निमित्ताने मंदिर व नदीच्या मार्गावर फुलांच्या आकर्षक पायघड्या घालण्यात आलेल्या.

सोहळ्याचे प्रमुख नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे आदी उपस्थित होते. स्नानानंतर दुपारी मंदिराच्या आवारात अश्वाचे रींगण झाले. त्यानंतर सोहळा पुन्हा मंदिरात विसावला. पालखी सोहळा निघाला नाही पण, सोहळ्यातील प्रथा व परंपरा जपण्यात आल्या.

सराटी-अकलूज येथे नीरा नदीत पादुकांना स्नान
सराटी-अकलूज येथे नीरा नदीत पादुकांना स्नान