आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात प्रहार संघटना आक्रमक:सातबारा उताऱ्यावरील शेरा कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जनावरे बांधून आंदोलन

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातबारा उताऱ्यावरील औद्योगिक वसाहतीसाठी संपादन हे शेरे कमी न केल्याने मंद्रूप येथील शेतकऱ्यांसह जनावरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मागील दोन वर्षापासून वारंवार निवेदन तक्रार करून ही उतारावरील शेरा कमी न केल्याने आंदोलन करत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील औद्योगिक वसाहतीसाठी राज्य शासनाने भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पण यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्याने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली नाही, पण राज्य शासनाच्या आदेशानुसार सातबारा उताऱ्यावर औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन असा शेरा लावण्यात आला.

शेतकऱ्यांना कर्ज काढण्यात अडचणी

मंद्रूप येथील 182 शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर मागील दोन वर्षांपूर्वी असे शेरे नोंदविण्यात आले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना जमिनीवर कर्ज काढणे व इतर सुविधा मिळविण्यात अडचणी येत आहेत. याबाबत वारंवार जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले पण या निवेदनाची कोणतीच दखल न घेतल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रहार संघटनेच्या वतीने जनावरे बांधण्यात आले व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनास परवानगी नाही

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रहार संघटनेच्या वतीने जनावरे बांधण्यात आली तर काही पदाधिकाऱ्यांनी जनावरे थेट आतील बाजूस असलेल्या बहुउद्देशीय सभागृहात नेली व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनास पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...