आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारसा स्थळाचे जतन:किल्ला बाग सुशोभिकरणासाठी दीड कोटींचा आराखडा, पावणे 2 एकर जागा पालिका देणार भाड्याने

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली किल्ला बाग पुरातन खात्याच्या ताब्यात असून, ती पालिकेच्या ताब्यात देण्यासाठी खासदार डाॅ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी सबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तेथील कामासाठी पालिकेने दिड कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

हा आराखडा जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात येणार आहे. पुणे ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रुपा भवानी मंदीर जवळ पर्ल गार्डनच्या बाजूस पालिकेची पावणेदोन एकर जागा असून, ते मंगल कार्यालयासाठी 30 वर्षाच्या मुदतीत भाड्याने देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

किल्ला बागेत सुशोभिकरण करुन नागरिकांसाठी खुले करण्यासाठी तेथे काम करणे आवश्यक आहे. तेथे लाईट व पाण्याचे कारंजेसह इतर कामासाठी दिड कोटी रुपये आवश्यक आहे. त्याचे आराखडा जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आला आहे. बाग पुरातन विभाग पालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविल्याने पालिकेने आराखडा तयार केला. वरवडेजवळ पालिकेची एकर जागा असून, ते वखार महामंडळाला देण्यात येणार आहे.

पावणे दाेन एकर जागा पालिका देणार भाड्याने

पुणे रोडवर पर्ल गार्डनच्या बाजूस टीडीआर पोटी मिळालेली पावणे दाेन एकर जागा मंगल कार्यालयासाठी तीस वर्षाच्या भाडे कराराने देण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्याबाबत टेंडर काढण्यात येणार आहे. रेडीरेकनर दराने किमान भाडे असणार आहे. त्यापेक्षा जास्त कोण मागेल त्यांना देण्यात येणार आहे. चार पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी कोटींच्या कामास महापालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

आसरा पुलाच्या आराखड्यासाठी 18 लाख भरणार

आसरा पुलाच्या कामासाठी आराखडा करण्यासाठी महापालिका 18 लाख रुपये भरणार आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. तसेच हद्दवाढ भागातील जागेची मोजणी करण्यासाठी पहिल्या टप्यात 4.18 कोटी रुपये महापालिका भरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...