आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यापीठ अनुदान आयोगाने नवे शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरू करण्याचे जाहीर केले आहे. चालू शैक्षणिक वर्षातील शेवटचे सत्र ३१ मेपर्यंत समाप्त होणार आहे. दरम्यान महाविद्यालयांच्या विद्याशाखानिहाय व्दितिय सत्र वेळापत्रकात तफावत दिसून येत आहे.
या दोन महिन्यांत वरिष्ठ महाविद्यालये व विद्यापीठास सुटी असणार आहे का? शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सुटी मिळणार काय? ३१ मेपर्यंत परीक्षांचे निकाल लागतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात उन्हाळी सुटीचा उल्लेख नाही.
वरिष्ठ महाविद्यालयांच्या विद्याशाखानिहाय द्वितीय सत्र समाप्तीच्या तारखांमध्ये मोठी तफावत पडलेली यंदा दिसून येत आहे. पारंपरिक महाविद्यालयांचे सत्र १० डिसेंबरपासून सुरू झाले आहेत. तर व्यावसायिक महाविद्यालयांचे सत्र १५ जानेवारीपासून सुरू झाले. दोन्हीसाठी सत्र समाप्तीची तारीख ३१ मे आहे. यामुळे पारंपरिक महाविद्यालयांचे सत्र सात महिन्यांचे होणार आहे.
यात दोन महिने वाढलेले आहेत. दुसरीकडे त्यांच्या द्वितीय सत्र परीक्षा पुढील आठवड्यापासून सुरू होत आहेत. शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरू होत असल्याने विद्यापीठांना त्याआधी निकाल लावून प्रवेश प्रक्रियाही पूर्ण करावी लागणार आहे. परीक्षा संपल्यानंतर दोन महिने सुटी द्यावी लागणार आहे. ती कधीपासून द्यायची, त्याचा उल्लेख आदेशात नाही.
सत्र प्रारंभ व समाप्तीच्या तारखा विद्यापीठाने घोषित केल्या असल्या तरी महाराष्ट्र शासन, यूजीसी किंवा एआयसीटीई यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे कुलसचिव योगिनी घारे यांनी परिपत्रकान्वये स्पष्ट केले आहे.
असे असेल द्वितीय सत्राचे वेळापत्रक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.