आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेला उधाण:पावसाला शरद पवारांचे आकर्षण, ग्रीष्मातही‎ बरसला‎; पवारांच्या सोलापुर दौऱ्यात वरुणराजाचीही हजेरी

सोलापूर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद‎ पवार पावसात भिजले की राजकीय‎ चर्चेला उधाण येते. परंतु, रविवारी‎ सोलापुरात झालेल्या पावसात त्यांचे‎ भिजणे शुभचिंतनाचे होते. निमित्त‎ होते सपाटे परिवारातील विवाह‎ सोहळ्याचे.‎

शरद पवार हे रविवारी सोलापुरात होते.‎ पंढरपूर आणि सांगोला येथील‎ कार्यक्रम आटोपून रविवारी रात्री‎ साडे आठच्या सुमारास त्यांचे‎ सोलापुरात आगमन झाले. उमा‎ नगरीतील शरदचंद्र पवार‎ प्रशालेमध्ये विवाह सोहळ्याला‎ हजेरी लावण्यासाठी ते उतरले‎ तेव्हाच पावसाला सुरुवात झाली.‎ पावसामुळे जेवण करणारी वऱ्हाडी‎ मंडळींनी धूम ठोकली होती.‎

कार्यकर्ते खुर्च्या डोक्यावर घेऊन‎ पावसापासून बचाव करत होते.‎ पवार यांच्या डोक्यावर छत्री‎ देण्यासाठी काही कार्यकर्ते‎ सरसावले. परंतु, पवारांनी त्याचा‎ आडोसा न घेता पुढे जाऊन‎ वधू-वरांना आशीर्वाद दिले.‎ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने‎ छत्रपती शिवाजी महाराज चौकात‎ त्यांचे जोरदार स्वागत झाले. तेथून‎ पवार प्रशालेकडे रवाना झाले. त्याच‎ वेळी पावसाला सुरुवात झाली.‎