आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात वाढ:जोरदार चटके, पारा 43.3 °C , चार दिवसांत 5 अंशाने वाढ

सोलापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान शनिवारी नोंदवले गेले. आतापर्यंत ४१ अंशावर असलेले तापमान शनिवारी ४३.३ वर पोहोचले. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले.

दुपारी १२ नंतर बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवरील वर्दळ विरळ झाली. येणारे चार दिवस कडक उन्हाचे राहतील, अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील चार दिवसांत तापमानात ५ अंशाने वाढले आहे.

चार- पाच दिवस तापमान अधिक

मे च्या पहिल्याच अाठवड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तापमान ३५ ते ४० अंशांपर्यंत होते. शहरात आतापर्यंत सर्वाधिक तापमान ४२.३ अंशापर्यंत नोंदवले गेले होते, शनिवारी यात एका अंशाने वाढ होत ४३.३ वर पोहोचले आहे. आणखी चार ते पाच दिवस तापमान अधिकच राहणार आहे.

६ दिवसांतील तापमान

दिनांककमालकिमान
८ मे३८.४२२.९
९ मे३८.४२३.६
१० मे४०.४२४.९
११ मे४१.५२६.४
१२ मे४१.४२७.५
१३ मे४१.४२७.५