आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतीपैकी 12 ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने 177 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. बार्शी व सांगोला वगळता पंढरपूर, माढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या तालुक्यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काही ठिकाणी सरपंच एका गटाचा तर सदस्य अन्य गटाचे निवडून आले आहेत. पहिल्या फेरीपासून निकालात चढ-उतार पाहण्यास मिळाले. सरपंच पदाच्या निकालावरच सर्वांचे लक्ष होते.
ग्रामपंचायत निवडणूक
बार्शी तालुक्यात 22 पैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 19 पैकी 9 ग्रामपंचायती सरपंचासह राऊत गटाने ताब्यात घेतल्या आहेत. सोपल गटाने पाच ग्रामपंचायतीवर ताबा मिळविला आहे. 3 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सोपल गटाचा निवडून आला आहे तर सदस्य राऊत गटाचे विजयी झाले आहे. मा हाऊसिंंचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांना झटका बसला आहे. मुळ गाव असलेल्या मांडेगाव ग्रामपंयाचतीत सदस्य बिनविरोध झाले आहे तर सरपंचपदासाठी विरोधी गटाचा अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. रस्तापूर ग्रामपंचायतही अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
माढा - माढा तालुक्यातील आठही गावातील सरपंच व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहेत. या निकालावरून आमदार बबनराव शिंदे यांचे वर्चस्व दिसून आले.
सांगोला सांगोला तालुक्यातील सहापैकी 4 ग्रामपंचायतीवर आमदार शहाजी पाटील व राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांचे वर्चस्व दिसून आले.
पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील 10 ग्रामपंचायत निवडणुकीत 7 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला आहे. उर्वरित तीन ग्रामपंचयतीमध्ये भाजपा व स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
दक्षिण सोलापूर 17 पैकी एक बिनविरोध झाली आहे. महाविकास आघाडीने 12 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत तर भाजपकडे कंदलगाव, औज, होनमुर्गी व आचेगाव या ग्रामपंचायती आल्या आहेत. निंबर्गी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदावर काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांचे पुत्र श्रीदीप हसापुरे तर मंद्रुप ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता कोरे विजयी झाल्या आहेत.
अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यात 12 ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व मिळवले असल्याचा दावा माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला आहे तर एका ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे उर्वरित ग्रामपंचायती इतर पक्षाकडे गेल्या आहेत.
उत्तर सोलापूर 12 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून सात ग्रामपंचायतीमध्ये माजी आमदार दिलीप माने गटाचे सात, भाजपचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकमेव ग्रामपंचायत आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.