आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रमुख 6 मागण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह शहर व जिल्ह्यातील 37 अनुदानित महाविद्यालयातील 750 शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारपासून (दि.2) बहिष्कार आंदोलनात सहभागी होणार आहेत.
त्यामुळे विद्यापीठ व बारावी बोर्ड परीक्षेचे कामकाज ठप्प होणार आहे. गेल्या 5 वर्षापासून आम्ही वेळोवेळी आंदोलने केली. परंतु शासनाने आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही. त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे, असे सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात व सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित जाधव व सचिव भीमा मस्के यांनी कळविले आहे.
या आहेत सहा मागण्या :
आंदोलनात सहभागी महाविद्यालये व कर्मचारी : सोलापूर शहर : विद्यापीठ (166), संगमेश्वर (73), दयानंद कला शास्त्र (57) दयानंद शिक्षण शास्त्र (5), दयानंद विधी (6), दयानंद वाणिज्य (15), ए.आर. बुर्ला (8) छञपती शिवाजी रात्र (8), युनियन महिला (6), सोशल (6 ), वसुंधरा (8) लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला(5)
ग्रामीण : खेडगी कॉलेज, अक्कलकोट (37), सांगोला (17), विज्ञान, सांगोला (14), भारत जेऊर, करमाळा (8) , कर्मवीर भाऊराव पाटील, पंढरपूर ( 38 ), उमा, पंढरपूर (13) शिवाजी, बार्शी ( 56),
झाडबुके, बार्शी (10) सुलाखे, बार्शी (10), शिक्षणशास्त्र, बार्शी (6), विधी, बार्शी (6), माऊली, वडाळा (7), संतोष भीमराव पाटील, मंद्रूप (7), बाबुराव पाटील, अनगर (10), शंकरराव मोहिते पाटील, नातेपुते (5), संत दामाजी, मंगळवेढा (10), खेडगी, अक्कलकोट(35), महाडिक, मोडनिंब (8), विठ्ठलराव शिंदे, टेंभुर्णी (8), प्रतापसिंह मोहिते पाटील, करमाळा(7), के.एन. भिसे, कुर्डूवाडी (9), माढा कॉलेज (7), शंकरराव मोहिते, अकलूज (38), रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान, अकलूज (10), गरड महाविद्यालय, मोहोळ (11)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.