आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी 'नवरदेवां'चा मोर्चा:लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून थेट सोलापूरच्या कलेक्टर ऑफिसवर दिली धडक

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाला मुलगी मिळत नाहीत. आता आम्ही काय करायचे? म्हणून वैतागलेल्या तरुणांनी नवरदेवाचा वेशभूषेत मोर्चा काढून लक्ष वेधले.

महाराष्ट्र राज्यातील लग्न न झालेल्या तरुण मुलांना बायको मिळावी, या एका प्रमुख मागणीसाठी हा आगळावेगळा मोर्चा बुधवारी सोलापुरात पाहायला मिळाला.

लग्नासाठी मुलगी देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्याचा प्रकार सोलापुरात घडला. महाराष्ट्र राज्य ज्योती क्रांती संघटनेकडून हा मोर्चा काढण्यात आला. विवाहासाठी इच्छुक असलेल्या अनेक तरुणांनी नवरदेवाच्या वेशामध्ये या मोर्चात सहभाग नोंदवला. संघटनेचे अध्यक्ष रमेश बारसकर यांनी या अनोख्या मोर्चाचे नेतृत्व केले.

घोड्यांवर वरात समोर बँड बाजा वाजवत काही नवरदेव बिना नवरीचे सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले पाहायला मिळाले. हे लग्न नव्हते तर हा मोर्चा होता. लग्नाला मुलगी मिळत नाही आता आम्ही काय करायचे? म्हणून वैतागलेल्या तरुणांनी नवरदेवाचा वेशभूषेत हा मोर्चा काढून लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्यातील लग्न न झालेल्या तरुण मुलांना बायको मिळावी या एका प्रमुख मागणीसाठी हा आगळावेगळा मोर्चा सोलापुरात पाहायला मिळाला.

संघटनेचे नेते बारसकर यांनी या मोर्चा मागील आपली भूमिका स्पष्ट करताना, युवकांना लग्नाला मुलगी मिळत नसेल तर काय करावे, आई वडील वैतागले, अशांकडे सरकारने लक्ष देऊन त्यांची मागणी सोडवावी अशी भूमिका त्यांनी मांडली.

लिंग गुणोत्तरात तफावत

अलीकडे मुली आणि मुलाच्या लिंग गुणोत्तरामध्ये मोठी तफावत निर्माण झाले आहे. त्यामुळे समाजिक असमतोल निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून सध्या समाजातील नव युवकांच्या लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...