आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:मेलबर्न येथील कला प्रदर्शनात सोलापुरी विणकराची कमाल

सोलापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कलास्पर्धेत भारतीय कलेचे स्वतंत्र दालन होते. त्यात सोलापुरातील विणकर राजेंद्र अंकम यांनी हातमागावरची कला सादर केली. ते पाहून युरोप खंडातील कला आस्वादकांनी विचारले, ‘हे हातमाग आणले कुठून..?’ त्यावर अंकम यांचे उत्तर होते, ‘सोलापूर...’

मेलबर्न येथे प्रदर्शनाची शनिवारी सांगता झाली. तीन दिवस प्रदर्शनात साेलापूरच्या हातमागावरील कला पाहण्यासाठी देश-विदेशातील लोकांनी हजेरी लावली. मान्यवर मंडळींनी स्वत:चे छायाचित्र देऊन त्याची प्रतिमा हातमागावर विणून देण्याची मागणीच नोंदवली. या कलेने ऑस्ट्रेलियन लोकांना भुरळ पाडल्याचे श्री. अंकम म्हणतात. या प्रदर्शनासाठी राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळाने देशभरातील केवळ पाच कलावंतांना निवडले होते. त्यात श्री. अंकम यांचा समावेश होता. सोलापूरसाठी भूषणावह ठरलेल्या या निवडीने साेलापूरची हातमाग कला आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली.

जागतिक बाजारपेठेत हातमाग कलेला संधी : “तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात युरोप आणि आशिया खंडातून अनेक कलावंत आले होते. सर्वच ठिकाणी आधुनिक तंत्रावरील कलेचे प्रदर्शन होते. परंतु भारतीय कलेमध्ये वैविध्यता होती. सोलापूरच्या हात मागावरील कलेने युरोप खंडातील कला आस्वादकांची मनेच जिंकली होती. तात्पर्य असा, की जागतिक बाजारपेठेत हातमाग कलेला अनेक संधी आहेत. त्याच्या मार्केटिंगमध्ये कमी पडतो, ”

छोटे हातमाग तयार केले, रंगीत धागे, साहित्य नेले
प्रदर्शनात कलेची प्रात्यक्षिके करण्यासाठी श्री. अंकम यांनी सोलापुरातच एक छोटा हातमाग तयार केला. उभ्या आणि आडव्या धाग्यांसाठी सूत रंगवले. विमानाने हे साहित्य नेले. धाग्यामधून जसजशी प्रतिमा तयार होईल, तसे लोक टाळ्या वाजवून या कलेचे कौतुक करायचे.

बातम्या आणखी आहेत...