आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअडीच वर्षांच्या कालावधीनंतर अखेर तोंडावरील मास्क खाली उतरणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने मास्क वापराबरोबरच कोरोना काळातील निर्बंध हटवले आहेत. निर्बंध कमी करण्यात आले असले तरी मास्क वापरणे ऐच्छिक असणार आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी व सुरक्षिततेसाठी मास्क आवश्यक असल्याचे आदेशात नमूद केले आहे. निर्बंध कमी केल्याने चित्रपटगृहे, सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम, मंदिरे यासह सर्वच ठिकाणी आता बंधने पाळावी लागणार नाहीत.
जिल्हा प्रशासनाला कोरोना काळात मास्क न वापरणे यासह विविध कारणांमुळे ७ लाख ४८ हजार ३३४ केसेसमधून २० कोटी ६४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तहसील कार्यालयाने केलेल्या कारवाईतून १७ लाख १७ हजार, नगरपालिका हद्दीत १६ लाख २९ हजार, पोलिस अधीक्षक ८ कोटी ९८ लाख, पोलिस आयुक्त १० कोटी ५ लाख, महापालिका १ कोटी १४ लाख, राज्य उत्पादन शुल्क २ लाख ३१ हजार, उपप्रादेशिक परिवहन विभाग, सोलापूर ९ लाख ४६ हजार, उपप्रादेशिक परिवहन विभाग, अकलूज ८८ हजार असा एकूण २० कोटी ६४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये वाहन चालवताना मास्क न वापरणे, कोरोना काळात नियमांची अंमलबजावणी न करणे, डबल सीट नियमांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.