आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराम्हैसूर एक्सप्रेस आता नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. त्याचे कारण म्हणजे ही 16335 /36 क्रमांकाची गाडी म्हैसूर -सोलापूर- म्हैसूर एक्सप्रेस आता एलएचबी ( लिंक हॉफमन बुश ) डब्यांसह धावणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांचा प्रवास नक्कीच सुखकारक होणाराय.
काय आहे बदल?
उत्तम सुरक्षितता आणि प्रवाशांच्या आनंदी अनुभवासाठी या गाडीत कायमस्वरूपी एलएचबी कोचेसमध्ये बदल करण्याचा निर्णय दक्षिण पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. खेळाडू चार्जिंग पॉइंट, बेसिन एसी आणि कमी किमतीत वातानुकूलित प्रवास शिवाय इतरही सुविधांचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. कमी किमतीत अधिक सुखकर आणि सुटसुटीत प्रवास करण्याचा आनंद या डब्यांमधून मिळणार आहे.
नियमांचे पालन
एलएचबी कोचची सुधारित संरचना असलेली ही गाडी आता 24 जून 2022 आणि 25 जून 2022 ला म्हैसूरमधून, तर 25 जून आणि 26 जूनपासून सोलापूरातून दिली जाणार आहे. याकरिता दक्षिण विभागात याचे काम सुरू आहे. या गाडीच्या सुधारणेत आता 2 ब्रेकयान 2 द्वितीय श्रेणी वातानुकूलित - 3 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 12 शयनयान, सामान्य द्वितीय श्रेणी असे एकूण 21 डबे जोडण्यात आले आहेत. विशेष सूचना म्हणून रेल्वे प्रशासनाने या गाडीतून प्रवास करताना कोव्हिड - 19 चे सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.