आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या कीर्तीचे कर्तब...:सलग 7.22 तास समुद्रात पोहत कापले 38 किमी अंतर

सोलापूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलतरणपटू कीर्ती नंदकिशोर भराडियाने अरबी समुद्रात सलग ७ तास २२ मिनिटे पोहत ३८ किमी अंतर कापत पराक्रम केला. { दुपारी १२ वाजता मुंबईत वरळी सी लिंकपासून पोहण्यास प्रारंभ, सायंकाळी ७.२२ वाजता गेट वे ऑफ इंडियात दाखल. { हा पराक्रम करताना कीर्ती भराडिया पाणीही पोहत पोहतच प्यायली. विक्रमाची कीर्ती : अरबी समुद्रात अविरत पाेहत ७.२२ तासांत गाठला सी लिंक ते गेट वे आॅफ इंडियाचा ३८ किमीचा पल्ला प्रतिनिधी | सोलापूर साेलापूरची १६ वर्षीय जलतरणपटू कीर्ती नंदकिशोर भराडियाने अविरत पाेहत ७ तास २२ मिनिटांत अरबी समुद्रात ३८ किलोमीटरचे अंतर गाठण्याच्या विक्रमाला गवसणी घातली. तिने गुरुवारी हा विश्वविक्रम केला. तिने सकाळी १२ वाजता मुंबईतील वरळी सी लिंक येथून तिने पोहायला सुरुवात केली आणि सायंकाळी ७.२२ वाजता गेट वे आॅफ इंडियापर्यंत आली. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कीर्तीने सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावात दररोज आठ तास सराव केला. गेल्या दीड महिन्यापासून मुंबई येथील समुद्रात सुद्धा तिने पोहण्याचा सराव केला आहे. पहिल्यावेळी तीने पाच, दुसऱ्यावेळी १०, तिसऱ्या वेळी १५, चाैथ्या वेळी २० किलाेमिटरचा सराव तिने केला. त्यानंतर तिने ३६ किलाे मिटरचा संकल्प केला आणि ३८ किलाे मिटरचे अंतर पुर्ण करून विश्वविक्रम केला. ती गेट वे ऑफ इंडिया जवळ येताच तिचे कुटूंबिय, मित्र मंडळी आणि प्रशिक्षकांनी एकच जल्लाेष केला.

आज सोलापुरात मिरवणूक : कीर्ती सकाळी सात वाजता सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाेहाेचणार आहे. तेथून चार पुतळ्यापर्यंत तिची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

कीर्ती म्हणते, मुली वाचवा, त्यांना प्रोत्सहनही द्या कीर्तीच्या मते ‘मुली वाचवा यासह मुलींना प्रोत्साहन द्या,’ असा संदेश देणे महत्त्वाचे आहे. मुलींना सर्वांनी प्रोत्साहन दिले तर ती काहीही करू शकते. हे प्रोत्साहन जर तिला मिळाले तर ती कुठलेही यश खेचून आणू शकते, असा संदेश कीर्ती देत असल्याची माहिती वडील नंदकिशोर भराडिया यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...