आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोना माता शाळेतील उपक्रम:100 मुलींनी दिले लैंगिक शोषण अन् मासिक पाळीबद्दल ज्ञान

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाल लैंगिक शोषण म्हणजे काय ? ते कसे ओळखायचे आणि मासिक पाळीत कशा पद्धतीने स्वच्छता ठेवायची आहार कसा घ्यायचा किशोर अवस्थेत नेमक्या भावना काय असतात याचे सखोल ज्ञान देऊन सोनामाता शाळेतील विद्यार्थिनींना बोलते करत लैंगिक शिक्षणाचे धडे दिले.

यांची होती उपस्थिती

गुरुवारी या प्रकल्पांतर्गत सोनामाता प्रशाला लिमयेवाडी येथील शाळेमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात सर्वंकष लैंगिक शिक्षण पार पडले. यावेळी संस्थेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा अत्रे तसेच सोनामाता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस .शिंदे हे उपस्थित होते.

प्रिसिजन फाउंडेशन प्रस्तुत फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर मार्फत सोनामाता शाळेमध्ये तीन दिवसीय सर्वंकष र्लैंगिक शिक्षण पार पडले .यामध्ये पहिल्या दोन दिवसिय सत्रात आपले शरीर ,शरीराची रचना,किशोर वयात कोणते मानसिक ,शारीरिक आणि भावनिक बदल होतात आणि या सर्व बदलांना या वयामध्ये कसे सामोरे जावे याबद्दल माहिती देण्यात आली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी हा संवेदनशील विषयावर सुद्धा अतिशय मनमोकळेपणाने चर्चा केली. त्यांच्या प्रश्नांवर त्यांना मार्गदर्शन केले गेले शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून अशी मागणी आली की पालकांची या विषयावर गांभीर्याने चर्चा घडवून आणणे गरजेचे वाटले . प्रश्न पडले तर ते समुपदेशनाने सोडवले गेले पाहिजेत यासाठी समुपदेशन केंद्राची गरज आहे असे हे सांगण्यात आले. बाल हक्क आणि बाल शोषण या विषयावर चाईल्ड लाईनच्या संगीता पारशेट्टी यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच सायबर सेल मार्फत वसीम शेख सोशल मीडिया वापरताना त्याची काही खाजगी माहिती घेऊन गैरवापर केला जातो त्याच्यातून ब्लॅकमेलिंग करणे वगैरे होताना दिसतात त्याच्यावर आळा घालण्यासाठी सायबर सेल सारख्या डिपार्टमेंट कडून अनेक कायद्या विषयी सखोल माहिती देण्यात आली बार्टी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रणिता कांबळे विविध योजनांचा माहिती दिली.

मोफत हिमोग्लोबिनची तपासणी

तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्तीचाही आवर्जून उल्लेख केला.तिसऱ्या दिवशी एकूण 132 विद्यार्थी आणि 16 शिक्षक यांची मोफत हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली.यावेळी शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड कार्यक्रमाधिकारी वीरेंद्र परदेशी हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...