आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वाफसा न झाल्याने ज्वारीच्या पेरण्या लांबल्या

वाशिंबे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे शेतात वाफसा न झाल्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी लांबली आहे. त्यातच करमाळा तालुक्यात ज्वारीची पेरणी दरवर्षीपेक्षा कमी प्रमाणात झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात सततचा पाऊस, जमिनीतील ओलावा या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्याचे जिराईत भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत.

रब्बी पेरण्या सरासरी एक महिना उशिरा होत आहेत त्यामुळे शेतीचे सगळे गणित कोलमडले आहे. दरवर्षी साधारणपणे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या ऑक्टोबरमध्ये उरकल्या जातात मात्र यावर्षी नैसर्गिक संकटामुळे रब्बी हंगामातील पेरण्यांना उशीर झाला आहे.परिणामी आता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण होण्याची आशा आहे. रब्बी हंगामात ज्वारी, गहूं, हरभरा कांदा, कडधान्यांच्या पेरण्या केल्या जातात.

१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी केली केली जाते त्यामुळे या काळात सुयोग्य वातावरण असल्याने गव्हाच्या पेरण्या जास्त प्रमाणात होणार आहेत.परतीच्या मोसमी पावसाने मुक्काम लांबवला. तसेच अनेक भागात अतिवृष्टीही झाली. त्यामुळे नदी, नाले, ओढे पाण्याने वाहत होते. शेतात पाणी साचले. पिके पाण्यात बुडाली. त्यामुळे वापशासाठी उशीर झाला. परिणामी पेरणी लांबली.

गहू, हरभरा, ऊस क्षेत्रात वाढ होईल
ज्वारीच्या पेरणी कालावधी मध्ये सततच्या पावसामुळे ज्वारी पेरणी हंगाम पुढे गेला आहे.त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटत आहे.गहू, हरभरा,ऊस या पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.” -संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, करमाळा

बातम्या आणखी आहेत...