आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावृक्षलागवड, संवर्धनाची आवड असणाऱ्या दमानी नगर येथील वृक्षप्रेमींनी सोलापूर-मंगळवेढा रस्त्याच्या दुतर्फो 15 किलोमीटर अंतर पायी चालत स्थानिक प्रजातींच्या झाडांचे बिया लावल्या. समाज माध्यमाद्वारे वृक्षसंवर्धनाच्या उद्देशाने एकजूट झालेल्या पर्यावरण स्नेहींची कृतीशील विधायकता सर्वांसाठी प्रेरक आहे, असा संदेश सोलापूरकरांनी दिला.
दमाणी नगरमध्ये ‘पर्यावरण प्रेम’ मंडळ आहे. त्यामध्ये निवृत्त कर्मचारी, काही व्यापाऱ्यांचा सहभाग आहे. मागील काही वर्षांपासून शहर, परिसरात वृक्षारोपण, संवर्धनासाठी हे मंडळ पुढाकार घेत असते. रोपं विकत घेणे, त्यासाठी खड्डे खोदणे, त्यांस ट्री गार्ड बसवणे आर्थिकदृष्टया परवडणारे नसल्याने त्यांनी स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या बिया मागवल्या आहेत.
जमा केलेल्या वर्गणीतून 20 किलो करंज झाडांच्या बिया आणल्या. जीवामृत, सेंद्रीय कीटकनाशक पावडरचा वापर करुन त्यावर बीजप्रक्रिया केली. चौघेजण दोन मोटारसायकलद्वारे दहा किलोंची बिया मोटारसायकलवरून घेऊन देगावला गेले. दोघांनी पिशवीमध्ये त्या बिया अन् जमीन उकरण्यासाठी छोट्या औजाराद्वारे रस्ता दुतर्फो त्या बिया जमिनीमध्ये लावल्या. जमिन उकरून त्यामध्ये करंजाच्या बी टोचायचे अन् पुढे जायचे, असा त्यांचा पायी प्रवास सुरु होता. असा त्यांचा रविवारचा उपक्रम होता.
आम्ही चौघांनी रविवारी 15 किलोमीटर परिसरात पायी जाऊन बीजारोपण केले. शहराच्या प्रत्येक मार्गाच्या हायवेवर वेगवेगळ्या जातीच्याबिया पेरण्याचा आमचा मानस आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास डोंगर, दर्या, खडकाळ प्रदेश, सह्याद्री पर्वतांवर, गड किल्ल्यांवर ड्रोनद्वारे बीजारोपण करण्याचा मानस आहे. लावलेल्या सर्व बियांचे मोठे वृक्ष होऊन सावली मिळावी हीच वन देवीच्या चरणी प्रार्थना.
- लक्ष्मण शेटे, पर्यावरण स्नेही, सोलापूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.