आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया:औरंगाबादमध्ये होणार खेलो इंडियाचे नेमबाजी प्रशिक्षण सेंटर; महाराष्ट्रामध्ये सुरू होणार 12 खेळांची 36 सेंटर

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या वर्षी दहा लाख अनुदान मिळणार

युवांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी भारतीय खेळ प्राधिकरणाने देशभरा खेलाे इंडियाची एक हजार केंद्रे स्थापन केली आहेत. चार वर्षांसाठी ही केंद्रे मंजूर केली. यात महाराष्ट्रात ३६ केंद्रे आहेत. औरंगाबादला शूटिंग, उस्मानाबादला खो-खो तर सोलापूरला बॅडमिंटन केंद्र मंजूर झाले अाहे.

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे यावर नियंत्रण असणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून युवांना खास प्रशिक्षण दिले जाणार अाहे. त्यामुळे खेळाडूंना अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची संधी अाहे. यासाठी तज्ञ प्रशिक्षकांचीही नियुक्ती करण्यात येईल. या प्राेजेक्टसाठी क्रीडा मंत्रालयाने काेट्यावधीचा निधी उपलब्ध केला अाहे.

सेंटर : सातारा, नाशिक, चंद्रपूर, सांगली, नंदुरबार (अॅथलेटिक्स), लातूर, रायगड, कोल्हापूर, हिंगोली (कुस्ती), वाशिम, सिंधदुर्ग, बीड, मुंबई ( कबड्डी), उस्मानाबाद, जालना (खो-खो), नांदेड ( टेबल टेनिस), बुलडाणा, भंडारा, परभणी (तलवारबाजी), जळगाव, वर्धा, अकोला, मुंबई (बॉक्सिंग), धुळे (फुटबॉल), यवतमाळ (हॉकी), गडचिरोली, अहमदनगर, अमरावती ( धनुर्विद्या), नागपूर, ठाणे, रत्नागिरी (बॅडमिंटन), पुणे ( व्हॉलिबॉल).

पहिल्या वर्षी दहा लाख अनुदान मिळणार
प्रत्येक केंद्राला एक वेळेस पाच लाखांचे अनुदान मिळणार. त्यातून क्रीडांगण तयार व अद्ययावत करणे, क्रीडा साहित्य व किट खरेदी करणे. प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ यांना मानधन देणे, न टिकणारे क्रीडा साहित्य व किट खरेदी, असा वार्षिक ५ लाख रुपये खर्च हाेईल. नितीन तारळकर, जिल्हा क्रीडाधिकारी, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...