आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पंढरपूर:आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत्या 15 जुलैपर्यंत बंद राहणार; मंदिरबंद असतानाही भक्तांकडून 16 लाखांचे दान

पंढरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिराला गतवर्षी 4 कोटी 40 लाख, यंदा ऑनलाइन 16 लाख 15 हजार 860 रुपये दान प्राप्त

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत्या १५ जुलै पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे, मंदिर समितीने प्रसिद्धी पत्रकाव्दारे ही माहिती दिली. कोरोना विषाणू संसर्मुगामुळे १७ मार्च पासून श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. या दरम्यान चैत्री आणि आषाढी यात्राही भाविकांविना पार पडल्या.

दरम्यान राज्यात लॉक डाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. मंदिर समितीने राज्य शासनाच्या सुचनेनुसार १७ मार्चनंतर दोन वेळा दर्शन बंदीचा कालावधी वाढवला आहे. यापूर्वी जाहीर केल्यानुसार ३० जूनपर्यंत दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला होता. मात्र आता ही मुदत १५ जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आषाढी यात्रे नंतरची प्रक्षाळपुजेचा उत्सव ९ जुलै रोजी मंदिरात होणार आहे. त्यानंतर श्री विठ्ठलाचे आँनलाईन २४ तास सुरु असलेले दर्शनही बंद होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

मंदिरबंद असतानाही भक्तांकडून १६ लाखांचे दान : 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा भाविकांविना पार पडली. या कालावधीत मंदिर बंद असले तरी विठ्ठलभक्तांनी घरी राहूनच आॅनलाईन पध्दतीने श्री विठुरायाचे दर्शन घेतले. आषाढी यात्रेच्या काळात २२ जून ते २ जुलै पर्यंत विठ्ठलभक्तांकडून ऑनलाईन अनछत्र कायम ठेव ६६ हजार रुपये, ऑनलाईन महानैवेद्य सहभाग योजनेमध्ये ३० हजार रुपये, आनलाईन देणगीमध्ये ३ लाख ४२ हजार ७१२ आणि देगणी जमा ११ लाख ७७ हजार १४८ असे एकुण १६ लाख १५ हजार ८६० रुपये आनलाईन व्दारा मंदिर समितीकडे जमा झाले आहेत.

दरम्यान मागील वर्षी आषाढी यात्रेला श्री विठ्ठल- रुक्मिचणी मंदिर समितीला विविध देणग्यांच्या माध्यमातून तब्बल चार कोटी ४० लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र कोरोनामुळे आषाढी यात्रा भरू न शकल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मि णी मंदिर समितीला केवळ १६ लाख १५ हजार ८६० रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.

0