आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:एसटी आठ फूट खड्ड्यात कोसळली 5  जखमी‎

मालवंडी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी तालुक्यातील मालवंडी - सुर्डी मार्गावर‎ स्टेअरिंग रॉड तुटल्याने एसटी बस सात फूट‎ खड्यात बस उलटली. या अपघातात‎ ४ ते ५ जण किरकोळ जखमी झाले‎ आहेत. सुदैवाने जिवीतहानी टळली.‎ कुर्डूवाडीवरुन वैरागकडे जाणारी एसटी सुर्डी‎ - मालवंडी दरम्यान रवि अॅग्रो प्रोसेसिंग‎ प्लँटजवळ आल्यावर हा अपघात झाला. हा‎ अपघात गुरूवारी सकाळी सकाळी‎ पावणेदहाच्या सुमाराला झाला.‎ बस पलटल्यानंतर प्रवाशांनी मोठा आक्रोश‎ केला.

एसटीच्या मागील व पुढील काचा‎ काढून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. ३५‎ प्रवाशांमध्ये काही महिलांचाही समावेश होता.‎ वाहक वैभव क्षीरसागर यांनी तत्काळ‎ मोबाईलवरुन वैरागच्या आरोग्य केंद्राशी‎ संपर्क साधून अॅम्बुलन्स बोलावून जखमींना‎ उपचारासाठी पाठवले.‎

बातम्या आणखी आहेत...