आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागात संपूर्ण महाराष्ट्राला लोकवाहिनी म्हणून परिचित परिचित असलेल्या एसटीने 75 वर्ष सामान्य प्रवाशांच्या विश्वास जागवला तो ती टिकवून ठेवला. अविरत सेवा देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठे महामंडळ म्हणून या व्यवस्थेकडे पाहिले जाते. हा विश्वास केवळ प्रवाशामुळे असून प्रवाशांनी आजवर दिलेल्या सोबती मुळे आणि सहकार्यामुळेच एसटी महामंडळाची 75 वर्षे सुखकर गेली असे मत आगार प्रमुख दत्तात्रय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. एसटी महामंडळाच्या सोलापूर आगार विभागाच्या वतीने एसटीच्या 75 व्या वर्षाच्या पदार्पणात आणि 74 व्या वाढदिवसानिमित्त अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एसटी अभियंता विभाग प्रमुख वीरसंग स्वामी, यंत्र अभियंता विवेक लोंढे, सुरक्षा व दक्षता अधिकारी शेखर फरांदे, वाहतूक निरीक्षक अशोक बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते .
पुढे ते म्हणाले की, एसटीने हजारो कुटुंबांच्या जडणघडणीत आईची आणि वडिलांची भूमिका पार पाडली आहे. एखाद्या गावाहून प्रवास करून शिक्षणासाठी जायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी तिचे महत्त्व आई-वडिलां प्रमाणेच होते. याशिवाय रुग्ण असो किंवा मतदान असो पूर असो किंवा भूकंप किंवा कोरोना किंवा मग आणखीन काही अशा सर्व काळात स्त्रीने सामान्य नागरिकांच्या गरजूंच्या आणि प्रशासनाच्या मदतीला कायम जात आपले वेगळे अस्तित्व दाखवून दिले आहे. तर सुरक्षा व दक्षता अधिकारी शेखर फरांदे यांनी एसटी महामंडळाने महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून सामान्य नागरिकांची लाल परी म्हणून एस टी ओळखली जाते. लाल परीने प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक गरजा भागवण्यासाठी अविरत 74 वर्षे प्रवास केला आणि हे 75 वे वर्ष असून येत्या 25 वर्षात आणखीन पुढे जाणाऱ्या एसटीने वेळोवेळी स्वतःची प्रगती केली आहे आणि त्यात महामंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केक कटिंग करून तिचा वाढदिवस साजरा केला आणि एसटीला सुंदर रीतीने सजवून तिची पूजा करून औक्षण करण्यात आले. याप्रसंगी प्रवासी व कर्मचारी यांना केक वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.