आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होटगी रोड विमानतळ येथून विमानसेवा सुरु करा:सोलापूर विकास मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारपासून चक्री उपोषण

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

होटगी रोड विमानतळ येथून विमानसेवा सुरु करा ही मुख्य मागणी करत सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर रविवार पासून चक्री उपोषण सुरु करण्यात आला आहे. रविवारी सुट्टी असताना नामवंत व्यक्ती उपोषणात सहभागी होत विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली.

सोलापूरचा विकास होण्यासाठी विमानसेवा सुरु होणे गरजेचे आहे. युवक स्थलातरीत होत असून त्यांना विमानसेवेची गरज आहे. उद्योग वाढीसाठी, उद्योजकांना सोलापुरात जलगदगतीने येण्यासाठी विमानसेवा आवश्यक आहे. विमानसेवेसाठी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासकिय व लोकप्रतिनिधीना निवेदन देवून पाठपुरावा केला. तरीही विमानसेवा सुरु होत नसल्याने रविवार पासून चक्री उपोषण सुरु करण्यात आला.

सर्वपक्षीय नेते, संघटना प्रतिनिधीची उपस्थिती

चक्री उपाेषणात सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते उपस्थित राहून आंदोलनास पाठीबा दिला. महिलांचा सहभाग होता. भाजपाचे माजी आमदार नरसिंग मेंगजी, प्राणीमित्र विलास शहा, अॅड. प्रमोद शहा, योगीन गुर्जर, विजय जाधव, डाॅ. सुरेश खमितकर, सलिम शेख, चेतन चौधरी आदी आंदोलनात होते.

राजकीय इच्छाशक्तीची गरज

होटगी रोड विमानतळ येथून विमानसेवा सुरु होण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असून, त्यासाठी सत्ताधारी पक्षाचे खासदार, आमदार यांनी प्रयत्न करावे अशी मागणी आंदोलकांनी केली.

ही विमानसेवा सोलापुरात का नाही?

''सोलापूरच्या बाजूला असलेल्या कर्नाटकातील विजयपूर आणि कलबुर्गीत विमानसेवा सुरु झाली सोलापुरात का नाही? राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.'' - चेतन चौधरी, युवक

मार्ग काढावे

''सोलापूरचा विकास आणि उद्योग वाढीसाठी सोलापुरातून विमानसेवा सुरु होणे आवश्यक आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे.'' - सलीम शेख, नागरिक

आजही उपोषण सुरु राहिल

सोलापूर विकास मंचच्या वतीने चक्री उपोषण सुरु करण्यात आले. विमानसेवेचे ठोस आश्वासन मिळत नाही. तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्यात येत आहे. आंदोलनाबरोबर स्वाक्षरी मोहिम घेण्यात येत आहे. सोमवारी आंदोलन सुरुच राहिल असे मंचच्या वतीने सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...