आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारने "हर घर नळ योजना" राबवावी:दुहेरी जलवाहिनी, नवीन बसस्थानक सुरू करा, आमदार सुभाष देशमुख यांच्या सूचना

सोलापूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या नव्या आयुक्त शीतल तेली- उगले यांची भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा केली. दुहेरी जलवाहिनी, हद्दवाढ भागात नवीन बस स्थानक, नाट्यगृह त्याचबरोबर गुंठेवारी यासह अन्य विषयांसंदर्भात सूचना केल्या.

देशमुख म्हणाले, शहराला होणारा पाणीपुरवठा नियमित व्हावा यासह दुहेरी जलवाहिनी व पाणीपुरवठा संदर्भात महापालिकेने जवळपास 550 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. उर्वरित जो 350 कोटीच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामध्ये वितरण व्यवस्था, जुनी पाईपलाईन बदलणे यासह इतर कामांचा समावेश आहे. यासाठीही चर्चा केली. हद्दवाढ भागात लाईटची व्यवस्था कमी आहे. हद्दवाढ भागात तत्काळ लाईटची सुविधा उपलब्ध करावी. लाईटची सुविधा नसल्याने येथील नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. होटगी रोड व अक्कलकोट रोड एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्या संदर्भात मंत्रालयात संबंधित तीन विभागाची बैठक घेण्यात यावी. त्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा.

सोलापूर शहरातील क्रीडांगणे व उद्यान विकसित करावेत. हद्दवाढ भागात अनेक वर्षापासून नवीन बस स्थानकाची मागणी होत आहे, त्याचीही कार्यवाही व्हावी. हद्दवाढ भागात एक नाट्यगृह आरक्षित जागेवर उभारण्यात यावे. छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या बाजूला स्मृती वना शेजारी असलेल्या महापालिकेच्या जागेवर बाबा गाडी तसेच पिकनिक स्पॉट करावा.

शहरातील आरक्षित जागा त्याच कारणास्तव विकासकांना देऊन विकसित करावेत जेणेकरून महापालिकेला उत्पन्न मिळू शकेल. शहरात ड्रेनेज योजनेचे दोन भाग पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. त्या निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.

शहरात विविध विकास कामासंदर्भात इतर विभागाने निधी दिलेला असतो, त्याला ना हरकत प्रमाणपत्राची गरज असते. ते प्रमाणपत्र महापालिकेने तत्काळ द्यावे. गुंठेवारीची जनजागृती करून त्या त्या नागरिकांच्या नावावर जागा करून द्यावी.

शहरातील स्मशानभूमी व्यवस्थित कराव्यात. शहरासाठी विशेष करून हद्दवाढ भागासाठी घंटागाड्या अपुऱ्या पडतात, त्याची संख्या वाढवावी. झोपडपट्टींमध्ये आवश्यक त्या नागरी सुविधा उपलब्ध कराव्यात. सार्वजनिक नळ बंद करण्यात येत आहे तेव्हा केंद्र सरकारची "हर घर नळ योजना" राबविण्यात यावी. हद्दवाढ भागामध्ये नागरी आरोग्य केंद्र आणखी सुरू करावेत यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...