आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:माळीनगर फेस्टिव्हलचा प्रारंभ; आयपीएस शुभम जाधव व अभिनेत्री आर्या घारे यांच्या हस्ते उद्घाटन

अकलूज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मॉडेल विविधांगी प्रशालेच्या भव्य मैदानावरील खुल्या रंगमंचावर शुक्रवारी सायंकाळी माळीनगर फेस्टिव्हलचे उद्घाटन सिनेअभिनेत्री आर्या घारे आणि हायस्कूलचे माजी विद्यार्थी आयपीएस अधिकारी शुभम जाधव यांच्या हस्ते मोठ्या दीप प्रज्वलन करून करण्यात आले.प्रारंभी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आर्या घारे आणि शुभम जाधव यांनी मुलांना जीवनात यशस्वी होण्यासाठी मोबाइलचे वेड बाजूला ठेवून शिक्षणाकडे लक्ष, खेळ खेळत रहाणे यावर मार्गदर्शन केले.

सहा डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी माळीनगर फेस्टिव्हलचे संस्थापक राजेंद्र गिरमे, फेस्टिव्हलचे अध्यक्ष पृथ्वीराज भोंगळे त्याचप्रमाणे एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश गिरमे, सेक्रेटरी सचिन बधे, खजिनदार नितीन इनामके, सरपंच अभिमान जगताप, उपसरपंच नागेश तुपसौंदर्य, सोमनाथ वाघमोडे,भानुदास सालगुडे-पाटील, विकास धाईंजे, अजय सकट, शुगरकेनचे चेअरमन अमोल ताम्हाणे, व्हा. चेअरमन कपिल भोंगळे, कारखान्याचे संचालक राहुल गिरमे, अशोक गिरमे, अजय गिरमे,जयवंत चौरे,दिलीप इनामके,ज्योती लांडगे,रिंकू राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...