आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांसाठी सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले होते. सेतू केंद्रातून चांगल्या पद्धतीने कामकाज करण्यात येत असताना नवीन ठेका न काढता सेतू केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सेतू सुविधा केंद्र चालू करावे अन्यथा प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्याचा इशारा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिला आहे. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व निवासी जिल्हाधिकारी शमा पवार यांना देण्यात आले. सेतू हे सोयीचे असल्याने सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होत होता, परंतु या निर्णयामुळे आता आपले सरकार केंद्रातून दाखले काढावे लागणार आहेत.
विविध दाखल्यांसाठी खासगी लोकांकडे जावे लागणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक लूट होण्याची शक्यता आहे, तसेच कागदपत्रांची बोगसगिरी वाढणार आहे. त्यामुळे शासनाने याचा फेरविचार करून तातडीने सेतू सुविधा केंद्र सुरू करावे, असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रशांत बाबर, प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, ज्योतिबा गुंड, महेश कुलकर्णी, मुस्सा अत्तार, ऋषिकेश शिंदे, विकास शिंदे, शरद येच्चे आदी उपस्थित होते.
विद्यार्थीहितासाठी सेतू सुरू करा : संभाजी ब्रिगेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सेतू कार्यालय बंद करण्यात आल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. परंतु सेतू कार्यालय बंद करू नये, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. सोलापुरातील सेतू कार्यालय पुन्हा सुरू करावे, या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना देण्यात आले. विद्यार्थी दाखला मिळवण्यासाठी सेतू कार्यालयात गर्दी करतात, सेतू कार्यालय बंद केल्यानंतर नागरिकांना, विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.
सेतू कार्यालयात जो दाखला ३५ रुपयांमध्ये मिळत होता, त्यासाठी महा-ई-सेवा केंद्रामध्ये १५० ते २०० रुपये मोजावे लागतील. याशिवाय महा-ई-सेवा केंद्रातून यापूर्वी चुकीची कामं झालेले अनुभव आहेत. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, सीताराम बाबर, रूपेश किरसावलगी, संघटक महेश माने, श्रीशैल बोरोटे, अक्षय जाधव, अभिमन्यू क्षीरसागर, प्रभाकर गायकवाड आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.