आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:आशाराणी डोके यांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार‎

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय‎ शिक्षक परिषदेतर्फे दिला जाणारा‎ राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार आशाराणी‎ डोके-भोसले यांना जाहीर झाला आहे.‎ पुरस्काराचे वितरण बुधवारी दुपारी ४ वाजता‎ शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या हस्ते‎ होईल. हा कार्यक्रम प्राथमिक शिक्षण‎ विभागात होणार असल्याची माहिती पप्पू‎ पाटील, सुनील चव्हाण यांनी दिली.‎ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून‎ शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, राजकीय,‎ संशोधन, अर्थकारण, प्रशासकीय आदी‎ क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या‎ महिलांना पुरस्काराने गौरवण्यात येते.‎ राज्यभरातून २० महिलांची निवड करण्यात‎ आली आहे. यंदाच्या वर्षी देवराज प्राथमिक‎ शाळेच्या मुख्याध्यापिका आशाराणी डोके‎ यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय‎ कार्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी‎ निवड केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...