आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासौर, तरंगती सौर ऊर्जा, पवन-सौर प्रकल्प उभारून अपारंपारिक उर्जा निर्मितीसाठी महाराष्ट्रात एनटीपीसी आणि महानिर्मिती मिळून संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास २ हजार ५०० मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी कंपनी काम करणार आहे.
सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातून ९३०५ मेगावॅट क्षमतेचे अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहेत. तर २१२३ मेगावॅटचे प्रकल्प प्रगती पथावर आहेत. तर येत्या ३१ मार्च २०२५ पर्यंत १७,३६० मेगावॅट क्षमतेचे अपारंपारिक ऊर्जा वीजनिर्मिती प्रकल्प विकसित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले झाले आहे. त्यात केवळ साैरउर्जेवर १२,९३० मेगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट आहे.
देशात अल्ट्रा मेगा नवीकरणीय ऊर्जा पार्क उभारण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याच्या तरतुदीनुसार अल्ट्रा मेगा नवीकरणीय ऊर्जा पार्क विकसित करता येतील. राज्य शासन विकासकांना पार्कसाठी जमीन तसेच आवश्यक मंजुरी देण्यासाठी सहाय्य करेल. या जमिनीचा विकास दोन वर्षांत आवश्यक आहे. राज्य शासनाने एक समिती गठीत करून सौर पार्क उभारणीस सहाय्य, प्रगतीचे संनियंत्रण आणि सौर ऊर्जा विकासकांना आकारण्यात येणारे प्राथमिक शुल्क आणि वार्षिक संचलन व देखभाल शुल्क निश्चित करेल. सौर ऊर्जा पार्क विकासकास नफा न मिळवता गुंतवलेल्या भागभांडवलावर जास्तीत जास्त १६ टक्के परताव्यास परवानगी राहील. अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क : ३१ मार्च, २०२० अखेर ९३०५ मेगावॅट क्षमतेचे अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. एकूण २१२३ मेगावॅट क्षमतेचे अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होण्याकरीता प्रगती पथावर आहेत. राज्य शासन अपारंपारिक ऊर्जा निर्मिती २०२० धोरणांनुुसार १७,३६० मेगावॅट क्षमतेचे अपारंपारिक ऊर्जा वीजनिर्मिती प्रकल्प ३१ मार्च, २०२५ पर्यंत राज्यात विकसित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय सोलर मिशन अंतर्गत देशात एकूण २० हजार मेगावॅट क्षमतेचे सोलर पार्क उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसीसोबत संयुक्त उद्यम कंपनी स्थापण्यासाठी राज्य शासनाची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
देशात अल्ट्रा मेगा रिन्युएबल एनर्जी पॉवर पार्क
केंद्रीय सार्वजनिक उपक्रम, राज्य सार्वजनिक उपक्रम, स्वतंत्ररित्या अथवा संयुक्त उद्यम कंपनी विकासक म्हणून काम करणार आहेत.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कंपनी, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी एक संयुक्त उद्यम कंपनीच्या माध्यमातून राज्यात कंपनी कायदयाच्या तरतुदीनुसार कंपनी स्थापन करून २५०० मेगावॅट क्षमतेचे अल्ट्रा मेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याचे विचाराधीन आहे.
केंद्रीय सहाय्य ३० टक्के, कंपनीत सहा संचालक : सौर ऊर्जा पार्क विकासकास पायाभूत सुविधा व इतर बाबीसाठी प्रति मेगावॅट २० लाख अथवा प्रकल्पाच्या विकासाच्या ३० टक्के यापैकी कमी असेल इतके केंद्रीय अर्थसहाय्य मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.